Pune School Bus Fitness Check: पुणे RTOचा निर्णय; दर रविवारी स्कूल बस फिटनेस तपासणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिवे येथील कार्यालयात विशेष मोहीम; पहिल्याच दिवशी 120 बसची तपासणी होणार
School Bus Safety
School Bus SafetyPudhari
Published on
Updated on

पुणे: नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिवे येथील कार्यालयात फिटनेस तपासणीचे काम दर रविवारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

School Bus Safety
Pune Rainfall: पुण्यात जून महिन्यात पावसाची मोठी तूट; 1958 नंतर दुसऱ्यांदा अत्यल्प पाऊस

या मोहिमेची सुरुवात उद्या रविवारी ( दि. २८) सकाळी ८ पासून होणार असून, पहिल्याच दिवशी तब्बल १२० स्कूल बसच्या फिटनेस तपासणीचा मोठा कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बसचालकांना यासाठी आगाऊ अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.

School Bus Safety
Khed Shivapur Highway Waterlogging: खेड शिवापूर पुणे-सातारा महामार्गावर पाणी साचण्याचा धोका; गटारे डबराने भरली

विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा, ही आमची प्राथमिकता आहे. शाळा सुरू झाल्यामुळे स्कूल बसची तपासणी करणे बंधनकारक आहे. शालेय व्यवस्थापन आणि बसचालकांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही दर रविवारी दिवे येथील कार्यालय सुरू ठेवून १२० वाहनांचा कोटा उपलब्ध करून दिला आहे. सर्वांनी आपल्या स्कूल बसची वेळेत फिटनेस तपासणी करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news