Pune Dengue Cases: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात डेंग्यूचा वाढता धोका; चार प्रभागांत ११२ रुग्ण

नांदेड, किरकटवाडी आणि खडकवासल्यात तापाच्या रुग्णांत वाढ; डासांची पैदास रोखण्यासाठी महापालिकेची फवारणी आणि स्वच्छता मोहीम
Dengue
DenguePudhari
Published on: 
Updated on: 

खडकवासला: नांदेड, किरकटवाडी, खडकवासलासह सिंहगड रस्ता परिसरात गेल्या महिनाभरापासून तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चार प्रभागांत आतापर्यंत डेंग्यूचे ११२ रुग्ण आढळले आहेत.

Dengue
Pataleshwar Caves Restoration: पुण्यातील पाताळेश्वर लेणीच्या नंदी मंडपाच्या दुरुस्तीला मुहूर्त; ६० लाखांचा निधी मंजूर

त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासह खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा सतर्क झाली आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून कीटकनाशकांची फवारणी आणि अंतर्गत रस्ते, ओढे-नाले व गल्लीबोळांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Dengue
Pune Janata Vasahat Land TDR: जनता वसाहत लँड टीडीआर प्रकरणात राज्य सरकारचा मोठा निर्णय; ७६३ कोटींच्या प्रस्तावानंतर कार्यपद्धती रद्द

रस्त्यांवरील तसेच ओढ्या-नाल्यांमधील साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. नांदेड, किरकटवाडी आणि खडकवासला परिसरात ही समस्या अधिक जाणवत आहे. सरकारी दवाखाने आणि खासगी रुग्णालयांमध्येही तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

Dengue
Pune Vegetable Market Prices: पुणे मार्केट यार्डात हिरवी मिरची, कोबी आणि फ्लॉवर स्वस्त

ओढे-नाले आणि रस्त्यांची स्वच्छता करून डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावीत. तसेच, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी आरोग्य पथके तैनात करावीत, अशी मागणी स्थानिक नगरसेविका धनश्री कोल्हे यांनी केली आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या देखरेखीखाली परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

Dengue
Pune Fruit Market Prices: पुण्यात लिंबू महागले; गोणीमागे २०० रुपयांपर्यंत वाढ

डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या परिसरात तातडीने कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. घरांमध्ये साठवलेल्या पाण्याची तपासणी करून डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट केली जात आहेत. डासांच्या अळ्या शोधून त्या नष्ट करण्याबरोबरच घरोघरी माहितीपत्रकांचे वाटप आणि आरोग्यविषयक जनजागृती केली जात आहे.

अनंत चाबुकस्वार, निरीक्षक, कीटकनाशक फवारणी विभाग, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

खडकवासला आणि किरकटवाडी येथे दोन डेंग्यूचे रुग्ण नुकतेच आढळून आले आहे. त्यानंतर आरोग्य पथकाने संबंधित परिसरात घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.

डॉ. शब्दा शिरपूरकर, वैद्यकीय अधिकारी, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news