Pune Fruit Market Prices: पुण्यात लिंबू महागले; गोणीमागे २०० रुपयांपर्यंत वाढ

मांसाहार सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली; खरबूज आणि पेरू स्वस्त, अन्य फळांचे दर स्थिर
Lemon
LemonPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने १५ ते २० किलोच्या गोणीमागे १५० ते २०० रुपयांची दरवाढ झाली आहे. श्रावण महिन्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत बहुतांश नागरिक मांसाहार टाळतात.

Lemon
Pune Diwali Grocery Prices: दिवाळी फराळ महागणार! खोबरे, शेंगदाणे, साखरेच्या दरात वाढ

सोमवारपासून हा कालावधी संपत असल्याने लिंबाच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती व्यापारी रोहन जाधव यांनी दिली. दरम्यान, उन्हाचा चटका कायम असल्याने कलिंगड, खरबूज, मोसंबी, संत्री आदी रसदार फळांना चांगली मागणी आहे. त्यामुळे खरबूज आणि पेरू वगळता सर्व फळांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

Lemon
Pune Fish and Meat Prices: नवरात्रोत्सवानंतर मांसाहाराला पसंती; मासळी, मटण महागले

मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने खऱबूज किलोमागे पाच रुपये तर पेरू वीस किलोंच्या क्रेटस्‌मागे दोनशे रुपयांनी स्वस्त झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रविवारी (दि. २५) लिंबाची एक हजार ते बाराशे गोणी, मोसंबी ६० ते ७० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब ७० ते ८० टन, पपई ९ ते १० टेम्पो, कलिंगड ५ ते ६ गाड्या, खरबूज १२ ते १३ टेम्पो, चिक्कू दोन हजार डाग, पेरू २ ते ३ हजार क्रेटस्, सीताफळ ८ ते ९ टन, ड्रॅगन फ्रूट ८ ते १० टन, सफरचंद सहा ते सात हजार पेट्या, बोरे ३० ते ३५ पोती आणि अननसाची ५ ट्रक आवक झाली.

Lemon
Pune Taljai Water Tank Accident: पुण्यात पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी; एल अँड टीच्या प्रकल्प व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

फळांचे दर पुढीलप्रमाणे:

लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते २५००, मोसंबी (३ डझन) : १४० ते ३२०, (४ डझन) : ५० ते १३०, संत्री (१० किलो) : १५० ते ८००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ७० ते २५०, आरक्ता : ५० ते १२०, गणेश : १० ते ४०, कलिंगड : १२ ते २०, खरबूज : २० ते ३५, पपई : १५ ते ३०, चिक्कू (१० किलो) : १०० ते ६००, पेरू (२० किलो) : ३०० ते ५००, अननस (१ डझन) : ३०० ते ९००, सीताफळ (प्रतिकिलो) : २० ते १००, ड्रॅगन फ्रूट (प्रतिकिलो) : २० ते १२०, सफरचंद (१५ ते २५ किलो) : १४०० ते ४५००, बोरे (१० किलो) : ९०-९००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news