Pune Vegetable Market Prices: पुणे मार्केट यार्डात हिरवी मिरची, कोबी आणि फ्लॉवर स्वस्त

आवक वाढल्याने फळभाज्यांच्या दरात १० टक्क्यांची घसरण; कोथिंबिरीची आवक घटल्याने पालेभाज्यांना तेजी
Vegetable
VegetablePudhari
Published on: 
Updated on: 

शंकर कवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात राज्यासह परराज्यातून हिरवी मिरची, कोबीसह स्थानिक भागातून फ्लॉवरची आवक वाढली आहे. त्यातुलनेत मागणी कमी राहिल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. रविवारी बाजारात ९० ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. गत आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहिली. बाजारातील आवक जावक कायम असल्याने बहुतांश फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.

Vegetable
Pune Fruit Market Prices: पुण्यात लिंबू महागले; गोणीमागे २०० रुपयांपर्यंत वाढ

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये बेंगलोर येथून आले २ टेम्पो, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची २० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ ते ३ टेम्पो, इंदूर येथून गाजर ५ ते ६ टेम्पो, आंध्र प्रदेश, हिमाचल मटार १ टेम्पो, तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग २ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा १ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी १०० क्रेट, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो, इंदूर, आग्रा आणि स्थानिक येथून बटाटा ५० ते ६० टेम्पो आवक झाली होती.

Vegetable
Pune Diwali Grocery Prices: दिवाळी फराळ महागणार! खोबरे, शेंगदाणे, साखरेच्या दरात वाढ

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार ५० ते ६० गोणी, घेवडा आणि पावटा प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कांदा सुमारे १०० ते १२० टेम्पो आवक झाली होती.

Vegetable
Pune Fish and Meat Prices: नवरात्रोत्सवानंतर मांसाहाराला पसंती; मासळी, मटण महागले

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव:

कांदा : ३५०-४५०, बटाटा : ८०-२८०, लसूण : ७००-२१००, आले (सातारी) : ५००-६००, भेंडी : २००-४००, गवार : ४००-६००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ३५०-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २००-३००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : ४००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ६०-१००, वांगी : २००-४००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ४००-६००, गाजर : ३००-३५०, वालवर : २५०-३००, बीट : १८०-२००, घेवडा : ४००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ६००-८००, मटार : ८००-१२००, पावटा : ८००-१०००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १०००-११००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

Vegetable
Pune Taljai Water Tank Accident: पुण्यात पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी; एल अँड टीच्या प्रकल्प व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

कोथिंबीर, मेथी तेजीत...

कोथिंबिरीच्या सव्वा लाख, तर मेथीच्या ४० ते ५० हजार जुड्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक २५ हजार जुड्यांनी घटली, तर मेथीची आवक स्थिर राहिली. पाण्याच्या तुटवड्यासह उन्हाच्या चटक्याचा परिणाम भाज्यांच्या प्रतवारीवर होत आहे. त्यामुळे दर्जेदार पालेभाज्यांना अधिक दर मिळत असल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारात पालेभाजीच्या एका गड्डीची ५ ते २५ रुपयांना तर किरकोळ बाजारात १५ ते ४० रुपयांना विक्री सुरू आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :

कोथिंबीर : १०००-२५००, मेथी : २०००-२५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ५००-१०००, करडई : ५००-१०००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ५००-१०००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-१०००, चुका : ५००-१२००, चवळई : ५००-८००, पालक : १०००-१५००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news