Pune Shiv Jayanti Traffic Diversion: शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीच्या मार्गात बदल; कोणते रस्ते, पर्यायी माग काय?

लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पर्यायी मार्गांची अंमलबजावणी
Pune Road Diversion
Pune Road DiversionPudhari
Published on
Updated on

पुणे: श्री शिवजयंतीनिमित्त शहरातील मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी (दि. 19 फेबुवारी) तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, तसेच पं. जवाहरलाल नेहरू रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. गर्दी संपेपर्यंत प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत हा बदल असणार आहे.

Pune Road Diversion
Kharadi Builder Encroachment Action: खराडीतील बिल्डरसाठी अतिक्रमण कारवाई; आदेश कुणाचा, प्रशासनालाच अंधार

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मध्य भागातून मिरवणूक काढण्यात येते. मध्य भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, तसेच कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. बुधवार पेठेतील हुतात्मा चौकातून स्वराज्य रथ मार्गस्थ होतात. शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल येथे मिरवणुकीचा समारोप होतो. स्वराज्य रथांच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

Pune Road Diversion
Pune Mohammadwadi PMAY TDR Land: महमंदवाडीतील रस्त्याविना जागेसाठी 55 कोटींचा टीडीआर; पीएमएवाय प्रस्ताव वादात

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक, झाशीची राणी चौक, खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. गणेश रस्ता, जिजामाता चौक या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहन चालकांनी दारूवाला पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.

Pune Road Diversion
Bhigwan Girl Kidnapping: २१ वर्षीय तरुणीचे लग्नाआधीच अपहरण; भिगवणमध्ये संतापाची लाट, हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा

लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पूरम चौकातून बाजीराव रस्तामार्गे शिवाजी नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, डेक्कन जिमखानामार्गे शिवाजीनगरकडे जावे. मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर वाहनचालकांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून शिवाजीनगरकडे जावे.

Pune Road Diversion
Pune Shivjayanti Swarajya Rath Sohala: पुण्यात शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा”; 96 स्वराज्यरथांचा सहभाग

तसेच मध्य भागात शिवाजीनगरकडून येणाऱ्या वाहनचालकांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून नारायण पेठेकडे यावे. केळकर रस्त्याने बाजीराव रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी नारायण पेठमार्गे इच्छितस्थळी जावे. मध्य भागातील वाहतुकीत सकाळी सातनंतर बदल करण्यात येणार आहे. मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतुकीस रस्ते खुले करून दिली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news