Kharadi Builder Encroachment Action: खराडीतील बिल्डरसाठी अतिक्रमण कारवाई; आदेश कुणाचा, प्रशासनालाच अंधार

बोराटेनगरमधील धडक कारवाईवर आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडवाउडवी
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: खराडी परिसरातील एका बड्या बिल्डराच्या भूखंडावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या माध्यमातून हटविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कारवाईचे आदेश नेमके कुणी दिले, याबाबत प्रशासनच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

Pune Municipal Corporation
Pune Mohammadwadi PMAY TDR Land: महमंदवाडीतील रस्त्याविना जागेसाठी 55 कोटींचा टीडीआर; पीएमएवाय प्रस्ताव वादात

याबाबत थेट आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे सोमनाथ बनकर यांना विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत माहिती घेऊन सांगतो, अशी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

Pune Municipal Corporation
Pune Shivjayanti Swarajya Rath Sohala: पुण्यात शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा”; 96 स्वराज्यरथांचा सहभाग

महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने गेल्या आठवड्यात महापौर व उपमहापौर निवडणुकीची लगबग सुरू असताना खराडीतील बोराटेनगर येथे मोठी कारवाई केली. तब्बल 1 लाख 85 हजार चौरस फूट, अनधिकृत कच्चे-पक्के शेड व बांधकाम यावर ही कारवाई करण्यात आली. भल्यापहाटे करण्यात आलेली ही कारवाई महापालिकेत चर्चेचा विषय ठरली. एका बड्या बिल्डरसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे आता समोर आल्याने प्रशासनाचे बिंग फुटले आहे. संबंधित बिल्डरसाठी महापालिकेत वरिष्ठ पातळीवरून सूत्रे फिरली व मोठ्या बंदोबस्तात ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

Pune Municipal Corporation
Pune Bhandarkar Institute Exhibition: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थाचा 108 वर्षांचा दुर्मीळ ठेवा प्रथमच नागरिकांसाठी खुला

दरम्यान, या कारवाईचे आदेश कुणी दिले? अतिक्रमणधारकांना कधी नोटीस बजावण्यात आली होती? याबाबत प्रशासनाला विचारले असता, त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत याची माहिती घेतो, असे उत्तर दिले. खराडीतील भारतमाता नावाने अनधिकृत मार्केट सुरू असल्याची तक्रार प्रशासनाकडे आली होती.

Pune Municipal Corporation
Pune Free Legal Aid Services: पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा न्यायप्रवेशासाठी पुढाकार; 1,342 जणांना मोफत मदत

त्यानुसार कारवाई करण्यात आली असून, कोणाच्या खासगी जागा रिकामी करून देण्यासाठी कारवाई झाली असेल, तर ती चुकीची आहे. याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल, असे उत्तर त्यांनी दिले. तर, बांधकाम व अतिक्रमण विभागाने ही कारवाई संयुक्तरित्या केली असून, कारवाईचे आदेश कुणी दिले, अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा कधी बजावल्या होत्या, याची माहिती शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना विचारली असताना त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news