Pune Shivjayanti Swarajya Rath Sohala: पुण्यात शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा”; 96 स्वराज्यरथांचा सहभाग

19 फेब्रुवारी 2026 रोजी लालमहाल येथून मिरवणूक; ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण
Shivjayanti Swarajya Rath Sohala
Shivjayanti Swarajya Rath SohalaPudhari
Published on
Updated on

पुणे: शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती गुरुवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लालमहाल येथून “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे यंदा सलग १४ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ९६ स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्टय असणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

Shivjayanti Swarajya Rath Sohala
Pune Bhandarkar Institute Exhibition: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थाचा 108 वर्षांचा दुर्मीळ ठेवा प्रथमच नागरिकांसाठी खुला

या मिरवणुकीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीआण्णा मोहोळ, पुणे महापौर मंजूषा नागपुरे, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, पोलीस पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कृषीकेश रावल, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर मांडेकर तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी सुनील रासने जेष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी उपस्थित रहाणार आहेत.

Shivjayanti Swarajya Rath Sohala
Pune Free Legal Aid Services: पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा न्यायप्रवेशासाठी पुढाकार; 1,342 जणांना मोफत मदत

समितीच्या जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत ह्या मानाच्या मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार करंजावणे देशमुख, सरदार चांगोजी कडू, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, सरदार झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई स्वराज्यबांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर,

Shivjayanti Swarajya Rath Sohala
RSS Education Institutions Board Change: शैक्षणिक संस्थांमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया; ‘आरएसएस’कडून तरुणांना संधी

सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, श्रीमंत पवार घराणे, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, सरदार भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, स्वराज्याचे निष्ठावंत सरदार दरेकर , स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, वीर फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्यघराणे, सरदार मंबाजी नाईक सोनवणे, सरदार थोरात, सरदार वाबळे, सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी होणार आहेत. 

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी "महाराणी ताराराणी शौर्य पथक" मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथक, ५१ रणशिंग पथक सहभागी होणार आहे.

Shivjayanti Swarajya Rath Sohala
PMC 23 Villages World Bank Loan: समाविष्ट 23 गावांसाठी दोन हजार कोटींचे जागतिक बँक कर्ज; पाणी-सांडपाणी प्रकल्पांना गती

सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, समीर जाधवराव, गोपी पवार, प्रवीणभैय्या गायकवाड, मंगेश शिळीमकर, मोहन पासलकर, किरण शितोळे यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे. पुणेकरांनी मोठया संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवजयंती महोत्सव समितीचे युवा सदस्य ईशान अमित गायकवाड एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूणार्कृती पुतळ्यावर सकाळी ११ ते १ या वेळेत हेलिकॉप्टरमधून सलग १५ व्या वर्षी पुष्पवृष्टी करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news