Pune Resident Doctors Strike: पुण्यात निवासी डॉक्टरांचे बेमुदत आंदोलन; ससून रुग्णालयातील ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया बंद

४०० निवासी डॉक्टरांचा कामबंद सहभाग; आपत्कालीन सेवा सुरू, मागण्यांवर लेखी निर्णयाची मार्डची मागणी
Pune Resident Doctors Strike
Pune Resident Doctors StrikePudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाला पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही पाठिंबा दिला आहे.

Pune Resident Doctors Strike
Pune Municipal Corporation Tender Issue: पुणे महापालिकेच्या शेकडो कोटींच्या निविदा रखडल्या; मर्जीतील ठेकेदारांसाठी दबावाचा आरोप

सुमारे ४०० निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याने ससून, रुग्णालयाची बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) आणि नियोजित शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या. मात्र, जनहिताचा विचार करून आपत्कालीन सेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्या. या आंदोलनामुळे नियमित रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

Pune Resident Doctors Strike
Junnar Crime: जुन्नर तालुक्यात दोन आत्महत्यांनी खळबळ; महिला आणि १७ वर्षीय मुलाने घेतला गळफास

शासन आणि सेंट्रल मार्डच्या शिष्टमंडळाची झालेली बैठक कोणत्याही ठोस निष्कर्षाविना संपुष्टात आल्याने सेंट्रल मार्डने पूर्वनियोजित राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बैठकीत शासनाने निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेतल्याचे सांगत आंदोलनाची नोंद घेतली. तसेच, सेंट्रल मार्डने मांडलेले सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांपर्यंत तातडीने पोचविण्यात येतील आणि येत्या काही दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

Pune Resident Doctors Strike
Wife Maintenance Rights: पत्नी कमावती असली तरी पतीच्या दर्जानुसार जगण्याचा अधिकार; न्यायालयाकडून 40 हजारांची अंतरिम पोटगी

काही मागण्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यांचा कायदेशीर चौकटीत विचार सुरू असल्याचेही शासनाने स्पष्ट केले. निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्यांबाबत कोणताही ठोस अथवा समाधानकारक निर्णय किंवा अधिकृत आश्वासन न मिळाल्याने सेंट्रल मार्डने ६ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन नियोजितप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून न्याय्य मागण्यांवर अधिकृत आणि समाधानकारक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. सेंट्रल मार्डने आपण सकारात्मक चर्चेवर विश्वास ठेवत असल्याचे नमूद करीत राज्यातील आरोग्य व्यवस्था आणि निवासी डॉक्टरांच्या हितासाठी शासनाने तातडीने निर्णायक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मागण्यांबाबत केवळ आश्वासन दिले आहे. लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्‍याची संघटनेची भूमिका आहे. त्‍यामुळे दोन दिवस आंदोलन सुरू आहे. या दरम्‍यान ओपीडी आणि नियोजित शस्‍त्रक्रिया बंद असतील. मात्र, आपत्‍कालीन स्‍थितीत रुग्णांवर उपचार आणि शस्‍त्रक्रिया केल्‍या जातील.

डॉ. धीरज धोटे (अध्यक्ष, मार्ड, बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे)

Pune Resident Doctors Strike
Shivajinagar Court Security Audit: शिवाजीनगर न्यायालयात गांजा प्रकरणानंतर खळबळ; सुरक्षा ऑडिटचे आदेश, ड्रग्ज सेवन करणारेही पोलिसांच्या रडारवर

सरकारने संप मागे घेण्याची आयएमएच्या डॉक्टरांना विनंती केली आहे. मात्र, जोपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची 'एमएमसी' नोंदणी प्रक्रिया थांबवली जात नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे. पुण्यातील आयएमएसह इतर संघटनांचे सात ते आठ हजार डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत.

डॉ. संजय पाटील, प्रवक्ते, आयएमए, पुणे शाखा

निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचा रुग्णसेवेवर कमीत कमी परिणाम होईल, यासाठी सर्व विभागप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. प्रत्येक विभागप्रमुख आणि वरिष्ठ डॉक्टर ओपीडीची जबाबदारी सांभाळतील. तसेच, नियोजित शस्त्रक्रियांचे योग्य नियोजन करण्याच्याही सूचना केल्या आहेत.

डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news