Pune Rural Police Wari Security: आषाढी वारीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा कडक बंदोबस्त; ५ हजार पोलिस तैनात

सहा पालख्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, डीजेवर बंदी आणि ‘हरित वारी’ उपक्रम राबविण्याचा निर्णय
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पुणे: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजन केले असून, ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या वारीसाठी पाच हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्‍त ठेवण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील मुक्कामस्थळांसह संपूर्ण मार्गावर कडक बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Police
Alandi Palkhi 2026: आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान; वारकऱ्यांसाठी जय्यत तयारी

पुणे ग्रामीण हद्दीतून संतांच्या एकूण सहा पालख्या मार्गक्रमण करणार आहेत. या काळात सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रत्यक्ष पालखी सोहळ्यासोबत राहून बंदोबस्तावर लक्ष ठेवणार आहेत. सुरक्षेसाठी एसआरपीएफ, क्यूआरटी, निर्भया पथक, गुन्हे शाखा आणि महिला शाखेची विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत.

Police
Maharashtra Government Books Online: महाराष्ट्र शासनाची दुर्मीळ पुस्तके आता ऑनलाइन उपलब्ध; घरपोच मिळणार शासकीय प्रकाशने

वारकऱ्यांच्या सोयीसाठी पालखी मार्गावर फिरती पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येणार असून, मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.

Police
Ketan Agarwal Murder Case: केतन अगरवाल खून प्रकरणात बीड कनेक्शन उघड; मित्राची पोलिसांकडून कसून चौकशी

स्वागत मंचांवर डीजे लावण्यास बंदी

वारीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, स्वागत मंचांवर डीजे लावण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यंदाची वारी डीजे आणि लाऊड स्पीकरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांकडून हरित वारी उपक्रमही राबवण्यात येणार असल्याचे संदीपसिंह गिल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news