Pune Run For Unity: पुणे रन फॉर युनिटीमध्ये परदेशी धावपटूंचे वर्चस्व; इथिओपिया, केनियाच्या खेळाडूंची बाजी

२१ किलोमीटर आंतरराष्ट्रीय गटात पुरुष व महिला विभागात परदेशी धावपटू अव्वल; भारतीय गटात सुनील कुमार आणि रविना गायकवाड यांना विजेतेपद
Pune Run For Unity
Pune Run For UnityPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे रन फॉर युनिटी’ अर्थात ‘पुणे राष्ट्रीय एकता दौड’ स्पर्धेत परदेशी धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. या स्‍पर्धेचे उद्‌घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सरचिटणीस राजेश पांडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अर्जुन पुरस्कार विजेते अंजली भागवत, राष्ट्रीय खेळाडू मनोज एरंडे, भारतीय माजी क्रिकेटपटू केदार जाधव, महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदींच्या उपस्‍थितीत करण्यात आले.

Pune Run For Unity
Sinhagad Fort: सिंहगड घाटात मद्यपी पर्यटक आणि स्थानिकांमध्ये तुंबळ हाणामारी; दोघांना मारहाण, मोबाईल गायब

‘पुणे रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन शहराच्या मध्यवर्ती टिळक (अलका) चौकात मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेच्या सुरुवातीला पहाटेपासूनच अलका चौक परिसर धावपटूंच्या गर्दीने फुलून गेला होता. तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशभक्तीपर गीतांचे सूर, तिरंगी ध्वज आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हलक्या गुलाबी थंडीतही स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

Pune Run For Unity
Pune Temperature: पुण्यात थंडीचा कडाका वाढला; एनडीएमध्ये पारा १०.२ अंशांवर, राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद

या मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गटातील धावपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २१ किलोमीटर आंतरराष्ट्रीय पुरुष गटात इथोपियाचा येगो इसॅक किप्रोनो यांनी १ तास ४ मिनिटे १७ सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, इथोपियाचा केमेई पॉल (१ तास ४ मिनिटे ४१ सेकंद) दुसऱ्या स्थानावर राहिले. तर, केनियाचा एल्कनाह किमेली अरुसेय याने १ तास ८ मिनिटे ५७ सेकंदांची वेळ नोंदवीत तृतीय क्रमांक पटकावला.

Pune Run For Unity
Pune Shirur Highway Project: पुणे-शिरूर महामार्गाचा ‘दुहेरी’ प्रकल्प रखडला; ७,३०० कोटींचे काम अद्याप सर्वेक्षणातच!

महिलांच्या २१ किलोमीटर आंतरराष्ट्रीय गटात तीन ही स्पर्धक केनियाचेच विजयी झाले. त्सेहाय देसालेग्न अधाना हिने १ तास १७ मिनिटे ४५ सेकंद वेळ देत प्रथम क्रमांक मिळवला. सेनयित अयेले अलेमु हिने द्वितीय स्थान पटकावले. मुरीकी जेन वांजिरू हिने तृतीय क्रमांक मिळविला. चुरशीच्या झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय गटातून पुरुषांमध्ये सुनील कुमार याने, तर महिलांमध्ये रविना विजय गायकवाड हिने विजेतेपद पटकावले. दोन्ही गटांतील अव्वल धावपटूंमध्ये सेकंदांची अत्यंत चुरस पाहायला मिळाली. पुरुष गटात सुनील कुमार याने १ तास ०४ मिनिटे २२ सेकंद अशी वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. त्याला कडवी झुंज देणारा शिवम सिंग तोमर (१ तास ०४ मिनिटे ५२ सेकंद) दुसऱ्या, तर राजन यादव (१ तास ०५ मिनिटे ३४ सेकंद) तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

Pune Run For Unity
Ramwadi Wagholi Metro: रामवाडी-वाघोली मेट्रोचा वेग मंदावला; २०२९ पर्यंत नगर रस्त्यावरील कोंडी कायम राहणार?

महिला गटात रविना विजय गायकवाड हिने १ तास १७ मिनिटे ३८ सेकंद वेळ नोंदवत बाजी मारली. तिच्यापाठोपाठ साक्षी संजय जदाल हिने अवघ्या चार सेकंदांच्या फरकाने (१ तास १७ मिनिटे ४२ सेकंद) दुसरे स्थान मिळवले. रिनू हिने तिसरा क्रमांक पटकावला. स्‍पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजूषा नागपुरे, अर्जुन पुरस्‍कार विजेते शकुंतला खटावकर, ग्रँडमास्‍टर अभिजित कुंटे, गिर्यारोहक उमेश झिरपे, सुरेखा द्रविड, शिवछत्रपती पुरस्‍कार विजेते श्रीरंग इनामदार, महादेव सपकाळ यांसह मान्यवर उपस्‍थित होते.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडचे देशभरात आयोजन केले असून, पुण्यात या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळाला. कोणतीही सकारात्मक संकल्पना पुण्यातून सुरू होते, तेव्हा तिला नेहमीच मोठा पाठिंबा मिळतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. सध्या समाजात ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून आक्रोश निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत देश अखंड ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

रवींद्र चव्‍हाण, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.