Pune Shirur Highway Project: पुणे-शिरूर महामार्गाचा ‘दुहेरी’ प्रकल्प रखडला; ७,३०० कोटींचे काम अद्याप सर्वेक्षणातच!

सहापदरी उन्नत महामार्गासाठी तीन वर्षे निविदेत गेली; नगर रस्त्यावरील वाहतूककोंडीतून दिलासा मिळण्यासाठी आणखी चार वर्षांची प्रतीक्षा
Nagar Road Traffic
Nagar Road TrafficPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: नगर रस्त्यावरील वाहतूककोंडीला पर्याय देण्यासाठी वर्षानुवर्षे विविध आराखडे पुढे येत असताना पुणे- शिरूर महामार्गाचा ‘दुहेरी’ प्रकल्प कागदावरच रखडला आहे. सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडील कागदपत्रांत पुणे- शिरूर (एनएच ७५३ एफ) या ५६ किलोमीटर मार्गासाठी दुहेरी स्तरावरील उन्नत महामार्ग आणि त्यात मेट्रोची तरतूद केली होती.

Nagar Road Traffic
Ramwadi Wagholi Metro: रामवाडी-वाघोली मेट्रोचा वेग मंदावला; २०२९ पर्यंत नगर रस्त्यावरील कोंडी कायम राहणार?

मात्र, या रस्त्याची रचना बदलत आता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला (एमएसआयडीसी) ५३.४ किलोमीटरचा सहापदरी अंशतः उन्नत महामार्ग उभारला जात आहे. मात्र, एमएसआयडीसीने २०२४ मध्ये निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये सुमारे ५,९९२ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती.

Nagar Road Traffic
Pune Vegetable Market Rates: पुण्यात काकडीचे दर दुप्पट; भेंडीही महागली, फ्लॉवर-कोबी स्वस्त!

तांत्रिक कारणास्तव निविदा रखडल्याने आणि २९ एप्रिल २०२६ मध्ये सुमारे सात हजार ३०० कोटी रुपयांना वेलस्पन एन्टरप्रायजेस कंपनीची निविदा मंजूर करून काम देण्यात आले. मात्र, उद्दिष्टानुसार केवळ निविदा काढण्यासाठी तीन वर्षे लागले असून, सध्या केवळ भू- तांत्रिक सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात नसून पुढील चार वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Nagar Road Traffic
Pune Fruit Market Rates: पुण्यात डाळिंबाचे भाव १० टक्क्यांनी घसरले; खरबूज, पपईसह 'या' फळांना तेजी!

प्रत्यक्षात ज्या वेगाने नगर रस्त्यावरील वाहतूक वाढत आहे, त्या तुलनेत प्रत्यक्ष वाहतूक दिलासा अद्याप भविष्यातच आहे. उन्नत मार्ग पूर्ण होईपर्यंत विद्यमान रस्त्यावर चौक, सेवा रस्ते, स्थानिक वाहतूक आणि अवजड वाहनांचा ताण आणखी किती दिवस सहन करावा लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nagar Road Traffic
Pune Grape Market: पुण्याच्या बाजारात नव्या हंगामातील द्राक्षांची एंट्री; ‘तास-ए-गणेश’ला १२०० रुपये दर!

महामेट्रोपुढे आव्हान

रामवाडी- वाघोली मेट्रो सध्या प्रत्यक्ष मेट्रो बांधकामापेक्षा निविदा आणि पूर्वतयारीच्या टप्प्यातच आहे. मुख्य व्हायाडक्ट व उन्नत रस्त्याच्या पॅकेजची तांत्रिक-आर्थिक प्रक्रिया सुरू असून, चार स्थानकांच्या स्वतंत्र निविदेला ‘डिस्चार्ज’ करण्यात आले. रामवाडी परिसरात आता केवळ भू-तांत्रिक सर्वेक्षणासाठी बॅरिकेडिंग सुरू झाले आहे. जुलै २०२९पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य असताना सप्टेंबर २०२६ पर्यंतची ही स्थिती पाहता, उर्वरित कामासाठी वेळेचे मोठे आव्हान महामेट्रोसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.