Ramwadi Wagholi Metro: रामवाडी-वाघोली मेट्रोचा वेग मंदावला; २०२९ पर्यंत नगर रस्त्यावरील कोंडी कायम राहणार?

११.६३ किलोमीटरच्या मार्गावर ११ स्थानके प्रस्तावित; मंजुरीनंतरही प्रत्यक्ष बांधकामाला अपेक्षित गती नाही
Metro
MetroPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: नगर रस्त्यावरील वाढत्या वाहतुकीला पर्याय देण्याचे आश्वासन देणाऱ्या रामवाडी-वाघोली मेट्रो प्रकल्पाची प्रत्यक्ष वाटचाल अद्याप संथ असल्याचे समोर आले आहे. सन २०२२ मध्ये सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मार्च २०२४ मध्ये मिळाली. त्यानंतर केंद्राची अंतिम मंजुरी मिळण्यासाठी सुमारे १५ महिने गेले.

Metro
Pune Vegetable Market Rates: पुण्यात काकडीचे दर दुप्पट; भेंडीही महागली, फ्लॉवर-कोबी स्वस्त!

आता २०२६ मध्ये रामवाडी परिसरात भू-तांत्रिक सर्वेक्षणासाठी बॅरिकेडिंग सुरू झाले असले, तरी मेट्रोची नियमित बांधकामे अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. त्यामुळे मेट्रो येईपर्यंत नगर रस्त्यावरील वाहतुकीचा वाढता भार कसा पेलायचा? हा प्रश्न कायम आहे.

Metro
Pune Fruit Market Rates: पुण्यात डाळिंबाचे भाव १० टक्क्यांनी घसरले; खरबूज, पपईसह 'या' फळांना तेजी!

रामवाडी-वाघोली विठ्ठलवाडी हा ११.६३ किलोमीटरचा मेट्रोमार्ग असून, त्यावर ११ स्थानके प्रस्तावित आहेत. विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळेनगर, अप्पर खराडी, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थनगर, बकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी या भागांना या मार्गाचा फायदा अपेक्षित आहे. मात्र, प्रकल्पाची प्रत्यक्ष प्रगती आणि नगर रस्त्यावरील सध्याची वाहतूककोंडी यामध्ये मोठी तफावत दिसून आली.

Metro
Pune Grape Market: पुण्याच्या बाजारात नव्या हंगामातील द्राक्षांची एंट्री; ‘तास-ए-गणेश’ला १२०० रुपये दर!

त्यानंतर या मार्गाचा डीपीआर २०२२ मध्ये पुढे आला. ११ मार्च २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाने प्रकल्पाला मंजुरी दिली. त्या वेळी प्रकल्पाची किंमत सुमारे ३,७५६ कोटी रुपये होती. केंद्र सरकारने २५ जून २०२५ रोजी प्रकल्पाला मंजुरी देताना खर्च ३,६२६.२४ कोटी रुपये निश्चित केला. पूर्णत्वासाठी चार वर्षांची मुदत देण्यात आली असून, जुलै २०२९ हे लक्ष्य ठेवण्यात आले.

Metro
Pune Fish Market Rates: दिवाळीनंतर पुणेकरांचा मांसाहारावर ताव; मासळीचे दर कडाडले!

दरम्यान, २०२६ मध्ये मुख्य बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पुढे सरकली. रामवाडी ते तुळजाभवानी दरम्यान सुमारे ४.८ किलोमीटर मेट्रो व्हायाडक्ट आणि त्यासोबत ४.७ किलोमीटर सहापदरी उन्नत रस्त्याची तरतूद आहे. मात्र, निविदा, तांत्रिक परीक्षण आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्यातील अंतर अद्याप कायम आहे. मेट्रो आणि उन्नत रस्ता पूर्ण झाल्यानंतर नगर रस्त्यावरील वाहतुकीला काही प्रमाणात पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे. पण, २०२९ पर्यंत वाढणारी वाहतूक, आयटी आणि निवासी क्षेत्रांचा विस्तार आणि सध्याच्या रस्त्याची मर्यादित क्षमता पाहता मेट्रो येईपर्यंत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोंडीतूनच मार्ग काढत जावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.