Pune Highway Black Spots: महामार्गांवरील १२१ ब्लॅक स्पॉटची पाहणी; अपघात रोखण्यासाठी आरटीओची विशेष मोहीम

पुणे जिल्ह्यातील पाच प्रमुख मार्गांवर संयुक्त तपासणी; २५ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
Accident Survey
Accident SurveyPudhari
Published on
Updated on

पुणे: महामार्गांवर सातत्याने होणाऱ्या जीवघेण्या अपघातांची मालिका थांबवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) जिल्ह्यातील वेगवेगळ्या ५ प्रमुख मार्गांवर निश्चित केलेल्या तब्बल १२१ ब्लॅक स्पॉटची (अपघातप्रवण क्षेत्रे) तातडीने संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीसाठी विशेष रस्ता सुरक्षा पथके नियुक्त केली असून, त्यांना २५ जूनपर्यंत आपला एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Accident Survey
Maharashtra TET Exam Guidelines: टीईटी परीक्षेसाठी कडक नियमावली; बुरखा, दुपट्टा, मोबाईलला बंदी

जिल्हाधिकारी आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी हे आदेश काढले आहेत. या मोहिमेत आरटीओ, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय, पीएमसी, पीसीएमसी, एमएसआरडीसी आणि एमएसआयडीसी या सर्व यंत्रणांचे प्रतिनिधी संयुक्तपणे काम करणार आहेत.

Accident Survey
Kasba Project Zero Waste: झिरो वेस्ट कसबा-भवानी प्रकल्पावर सभागृहात सवालांचा भडिमार

थेट घटनास्थळी जाऊन पाहणी

या सर्व नियुक्त पथकांमधील अधिकाऱ्यांना पोलिस उपअधीक्षक (जिल्हा वाहतूक शाखा, पुणे ग्रामीण) यांच्याशी समन्वय साधून थेट घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आणि अपघातांची कारणे शोधून त्यावर तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Accident Survey
SPPU Hostel Unauthorized Occupancy: पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ९ मध्ये कारवाई; अनधिकृत विद्यार्थ्यांना बाहेर काढले

...या ५ प्रमुख मार्गांची होणार पाहणी

१) पुणे-सोलापूर मार्ग : ४६ ब्लॅक स्पॉट (रस्ता सुरक्षा पथक क्र. २ आणि ६)

२) पुणे-पंढरपूर (जेजुरी रोड) : ७ ब्लॅक स्पॉट (रस्ता सुरक्षा पथक क्र. ४)

३) पुणे-बंगलोर मार्ग : १३ ब्लॅक स्पॉट (रस्ता सुरक्षा पथक क्र. ३ आणि ७)

४) पुणे-अहिल्यानगर (अहमदनगर) मार्ग : ३३ ब्लॅक स्पॉट (रस्ता सुरक्षा पथक क्र. १ आणि ८)

५) इतर मार्ग : २२ ब्लॅक स्पॉट (रस्ता सुरक्षा पथक क्र. ५)

Accident Survey
SRA Project Controversy: आनंदनगर एसआरए प्रकल्पात झोपड्यांची संख्या निम्म्याने कमी केल्याचा आरोप

पुणे जिल्ह्यातील महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण आणि त्यात जाणारे निष्पाप नागरिकांचे बळी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. फक्त दंडात्मक कारवाई करून अपघात थांबणार नाहीत, तर अपघातांच्या मूळ कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही महामार्गावरील १२१ ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. आमची विशेष रस्ता सुरक्षा पथके प्रत्यक्ष रस्त्यांची रचना, तेथील त्रुटी, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि वाहतुकीची स्थिती याचा बारकाईने अभ्यास करतील. पोलिस आणि पीडब्ल्यूडीसारख्या सर्व संबंधित यंत्रणांना सोबत घेऊन २५ जूनपर्यंत हा अहवाल पूर्ण केला जाईल आणि त्यानुसार तातडीने सुधारणात्मक उपाययोजना राबवल्या जातील. रस्ते सुरक्षित करणे आणि अपघात शून्यावर आणणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे.

स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news