SPPU Hostel Unauthorized Occupancy: पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ९ मध्ये कारवाई; अनधिकृत विद्यार्थ्यांना बाहेर काढले

: ३५ खोल्यांचे कुलूप तोडून वास्तव्य केल्याचा आरोप; प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह प्रशासनाने आणि सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत वसतिगृह क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. तसेच, अनेक खोल्यांना टाळे लावले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयाबाहेर आंदोलन केले. परंतु वसतिगृहाच्या काही खोल्यांचे कुलूप तोडून विद्यार्थी येथे राहत असल्याचे समोर आल्याने संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे.

SPPU
SRA Project Controversy: आनंदनगर एसआरए प्रकल्पात झोपड्यांची संख्या निम्म्याने कमी केल्याचा आरोप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक नऊ हे विशेषकरून संशोधक विद्यार्थ्यांसाठी अर्थात पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पीएच.डी.ची प्रक्रिया पूर्ण झाली की संबंधित विद्यार्थ्यांना याठिकाणी खोली देण्यात येते. पीएच.डी.ची प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे या वसतिगृहात अनेक खोल्या रिकाम्या असतात.

SPPU
Pune Municipal Schools: पुणे महापालिकेच्या शाळा आकांक्षा फाउंडेशनकडे; सभागृहाची मंजुरी

त्यामु‍ळे याठिकाणी असणाऱ्या तब्बल ३५ खोल्यांचे कुलूप तोडून त्याठिकाणी विद्यार्थी अनधिकृतपणे राहत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने संयुक्तपणे कारवाई करीत खोल्यांना कुलूप लावले. त्यातील काही खोल्यांना लावण्यात आलेले कुलूप तोडता येत नसल्याने संबंधित खोल्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन दिवसांत रूम सोडण्यास सांगण्यात आले आहे.

SPPU
Devachi Uruli Landfill Scam: देवाची उरुळी कचरा डेपोवर गंभीर आरोप; मिश्र कचरा टाकल्याचा दावा

विद्यार्थ्यांचे विविध विभागांमध्ये प्रवेश असले, तरी या खोल्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अधिकृतपणे रूम दिलेल्या नाहीत. तरीही या खोल्यांमध्ये हे विद्यार्थी राहत होते. त्यामुळे विद्यापीठाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार असून, नव्याने विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा कालावधी संपला आहे तसेच जे विद्यार्थी पॅरासाईड म्हणून राहत होते, अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाहेर काढण्यात आले आहे. विद्यार्थी संबंधित खोल्यांमध्ये अनधिकृतपणे राहत असल्यामुळे याठिकाणी कोणताही गैरप्रकार घडला, तर विद्यापीठाची नाहक बदनामी होण्याची शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SPPU
Sopandev Palkhi Sohala 2026: सासवड येथून संत सोपानदेव पालखी सोहळ्याला १२ जुलैपासून प्रारंभ

वसतिगृह क्रमांक नऊ हे संशोधक विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु, या वसतिगृहातील तब्बल ३५ खोल्यांचे कुलूप तोडून त्याठिकाणी विद्यार्थी अनधिकृतपणे राहत असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने वसतिगृह खाली करण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे.

डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news