Maharashtra RTE Admission: आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडली; 1 लाख जागांपैकी निम्मेच प्रवेश निश्चित

राज्यात आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत 57,135 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
RTE admission
RTE Admission Pudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत 57 हजार 135 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. एक लाख जागांपैकी निम्मेच प्रवेश झाल्यामुळे आणि प्रवेशासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना प्रशासकीय हलगर्जीपणामुळे मुलांचे प्रवेश निश्चित न झाल्यामुळे पालक हवालदिल झाले आहेत.

RTE admission
Pune Summer Science Camp: पुणे विद्यापीठात उन्हाळी विज्ञान शिबिरे; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांची संधी

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील आठ हजार 701 शाळांमध्ये एकूण एक लाख 14 हजार 826 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी दोन लाख 89 हजार 286 अर्ज दाखल झाले आहेत.

RTE admission
Maharashtra Police Officer Domestic Violence: उरुळी कांचनमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याचा सासरकडून छळ; गुन्हा दाखल

तर, रविवारी सायंकाळपर्यंत राज्यात 57 हजार 135 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची निवड यादीत नावे आली आहेत, त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शाळांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अपेक्षित प्रवेश न झाल्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

RTE admission
Pune MD Drug Addiction: पुणे-नगर रस्त्यावर एमडी ड्रग्जचा विळखा; तरुणाई व्यसनाच्या जाळ्यात

प्रवेशप्रक्रिया दृष्टिक्षेपात

  • प्रवेशाची शेवटची तारीख: 30 एप्रिल

  • शाळा: 8,701

  • अर्जनोंदणी: 2,89,286

  • प्रवेशासाठी उपलब्ध जागा: 114826

  • विद्यार्थ्यांची निवड: 1,05,811

  • प्रतीक्षा यादी: 86,034

  • विद्यार्थी प्रवेश: 57135

RTE admission
Maharashtra Water Reservoir Status: पिंगोरी जय गणेश जलाशयात 25% पाणीसाठा; यंदा पाणीटंचाई नाही

अधिकाऱ्यांच्या घरभेटीमुळे पालक हतबल

आरटीई प्रवेशासाठी नाव निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरांची अधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी करण्यात येते. परंतु, त्यामुळे पालकांना काम सोडून घरीच थांबावे लागत आहे. जर पालक घरी नसले तर अधिकारी पुन्हा कधी येणार? हे कोणीही सांगायला तयार होत नाही. त्यामुळे मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news