Pune Summer Science Camp: पुणे विद्यापीठात उन्हाळी विज्ञान शिबिरे; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांची संधी

विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, ड्रोन व प्रयोगाधारित शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

पुणे: उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देण्यासाठी आणि प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे विज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कतर्फे ‌‘उन्हाळी विज्ञान शिबिरे‌’ आयोजित करण्यात येत आहेत. 5 मे 2026 पासून विज्ञान शिक्षण आणि संशोधन केंद्रात ही शिबिरे सुरू होणार असून, इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ती खुली आहेत.

SPPU
Maharashtra Police Officer Domestic Violence: उरुळी कांचनमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याचा सासरकडून छळ; गुन्हा दाखल

या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांना प्रकाशाचे परावर्तन, पेरिस्कोप व इन्फिनिटी मिरर तयार करणे, सूक्ष्मदर्शकाखाली सूक्ष्मजीवांचे निरीक्षण, इलेक्ट्रॉनिक्सचे प्राथमिक प्रयोग, तसेच अणू व रासायनिक बंध यांचे प्रयोग अशा विविध विषयांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. याशिवाय, रोबोटिक्स आणि ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळखही विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे.

SPPU
Pune MD Drug Addiction: पुणे-नगर रस्त्यावर एमडी ड्रग्जचा विळखा; तरुणाई व्यसनाच्या जाळ्यात

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी फ्लूट, गिटार, स्टेथोस्कोप तयार करणे, केमिस्ट्रीतील प्रयोग, गणिती कोडी व पॅटर्न्स, तसेच टेरेसवर पर्यावरणपूरक शेती यांसारख्या उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.

SPPU
Maharashtra Water Reservoir Status: पिंगोरी जय गणेश जलाशयात 25% पाणीसाठा; यंदा पाणीटंचाई नाही

विशेष म्हणजे, 6 व 7 मे रोजी पालकांसाठी ‌’गणिताची वेगळी ओळख‌’ ही कार्यशाळा आयोजित केली आहे. तसेच ‌‘निसर्ग समजून घेणे‌’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्राणिसंग््राहालय भेटीचे आयोजनही करण्यात आले आहे.

SPPU
Maharashtra Fake Baba Fraud: बारामतीत भोंदूगिरीचा सुळसुळाट; देव-करणीच्या नावाखाली फसवणूक वाढली

विज्ञान अधिक सुलभ आणि रंजक करण्यासाठी रोबोटिक्स, एरोमॉडेलिंग, सॅटेलाइट तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक विषयांवर विशेष सत्रे आयोजित केली जाणार असून, ‌‘हँड्‌‍स-ऑन‌’ प्रोजेक्टद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू तयार करण्याची संधी मिळणार आहे. ही शिबिरे विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाचा उत्कृष्ट मंच ठरणार असून, त्यांना विज्ञानाची गोडी लागण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तसेच, काही शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू घरी नेण्याची संधीही दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news