Basmati Rice Price Increase: गॅस तुटवड्यामुळे भाताची मागणी वाढली; बासमतीचे दर चढले

साखर व मसाल्यांच्या दरातही वाढ; बहुतांश किराणा मालाचे दर स्थिर
Rice
RicePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात सुरू असलेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंपाकासाठी भाताकडे मोठ्या प्रमाणावर कल दाखविल्याने बासमती तांदळाची मागणी लक्षणीय वाढली आहे. देशांतर्गत बाजारपेठेसोबतच निर्यातही सुरू असल्याने परदेशातूनही मागणी वाढत आहे. या दुहेरी मागणीच्या परिणामस्वरूप बासमती तांदळाच्या दरात किलोमागे सुमारे 4 ते 5 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

Rice
Chakan Onion Market Rates: चाकण बाजारात कांद्याची आवक घटली; तरीही भाव स्थिरच

दरम्यान, केंद्र सरकारने चालू महिन्यासाठी 23 लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला असला, तरी वाढत्या उन्हामुळे थंडपेय, सरबत आदींच्या निर्मितीसाठी साखरेची मागणी वाढली आहे. परिणामी, पुरवठा अपुरा पडत असून, गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे सुमारे 30 रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत साखरेच्या दरात आणखी 50 ते 100 रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Rice
Pune Fish Price Rise: मासेमारी बंदीचा परिणाम; पुण्यात मासळीचे दर तेजीत कायम

हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा परिणाम मसाल्यांच्या बाजारावरही दिसून आला आहे. विशेषतः धन्याच्या दरात तेजी निर्माण झाली असून, घाऊक बाजारात किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर साठवणुकीदरम्यान माल खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने गोटा खोबऱ्याच्या दरातही किलोमागे सुमारे 20 रुपयांची वाढ झाली आहे. याउलट शेंगदाण्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, प्रकारानुसार किलोमागे 2 ते 5 रुपयांनी दर कमी झाले आहेत. बाजारात ग्राहकांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी असल्याने धान्य बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. गहू, ज्वारी आणि बाजरी यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत.

Rice
Baramati Political Banner Controversy: बारामतीत वादग्रस्त फलकांमुळे राजकीय वातावरण तापले; अजितदादा समर्थक आक्रमक

खाद्यतेल, डाळी व कडधान्ये यांच्याही दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. तसेच साबूदाणा, भगर आणि नारळ या वस्तूंचे दरही स्थिरच असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. एकूणच, काही निवडक वस्तूंमध्ये वाढ होत असली तरी बहुतांश किराणामालाचे दर सध्या स्थिर असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:

साखर (प्रतिक्विंटल) 4070-4100 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2670-2850, रिफाईंड तेल 2300-3000, सरकी तेल 2150-2550, सोयाबीन तेल 2250-2550, पामतेल 2300-2450, सूर्यफूल रिफाईंड तेल 2400-2600, खोबरेल तेल 4300, वनस्पती 1850-2300 रु. तांदूळ :- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4150-5000, एच.एम.टी. कोलम 5200-5500, लचकारी कोलम 6000-6500, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-12000, आंबेमोहोर (सुवासिक) 14000-16000, बासमती अखंड 12000-14000, बासमती दुबार 9500-10000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-9000-10000, इंद्रायणी 7000 रु. गहू - लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-3800, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु.

Rice
Baramati By Election: बारामती निवडणुकीत मोठा ट्विस्ट; लक्ष्मण हाके यांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी :- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300रु. गूळ :- गूळ नं. 1 4600-4750, गूळ नं.2 4300-4450 गूळ नं.3 4150-4250, बॉक्स 4300-5500 रु. डाळी :- तूरडाळ 10000-12600, हरभराडाळ 6700-7000, मूगडाळ 9800-10000, मसूरडाळ 7650-7800, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु. कडधान्ये :-हरभरा 6000-6500, हुलगा 5200-5700, चवळी 7700-10500, मसूर 7400-8400, मूग 9500-9800, मटकी गावरान 95500-16000, मटकी पॉलिश 6800-7700, मटकी गुजरात 14000-16000, मटकी राजस्थान 6500-7500, मटकी सेलम 16000-17200, वाटाणा हिरवा 5800-6200, वाटाणा पांढरा 4900-5200, काबुली चणा 7400-11200 रु. साबूदाणा :-साबूदाणा नं.1 6200, साबूदाणा नं.2 5800, साबूदाणा नं.3 5600 रु. वरई भगर :-13000-13500, सावा भगर 12500-13000 रु. गोटा खोबरे 3500-3800 रु. शेंगदाणा :- जाडा 11300-12800, स्पॅनिश12500-13500, घुंगरू 11500-12500 धने :- गावरान 12000-13000, इंदूर 15000-15000 इंदुर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पोहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 550-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1750, मैदा 1650-1750, बेसन :- (50 किलोस) 3600-4250 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 6000-65000, ब्याडगी 35000-50000, लवंगी तेजा 21000-22000, गुंटूर 23000-25000, खुडवा गुंटूर 11000-13000, खुडवा ब्याडगी 15000-16000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1700-1850, मद्रास 4600-4800, पालकोल जुना 2100-2300, सापसोल 3500-5000 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news