Baramati By Election: बारामती निवडणुकीत मोठा ट्विस्ट; लक्ष्मण हाके यांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

कृषिमंत्री भरणे यांच्या शिष्टाईला यश; ओबीसी नेत्यांनी घेतली माघार
Laxman Hake
चुकीचे केले असेल, तर जेलमध्ये टाका: लक्ष्मण हाकेPudhari File Photo
Published on
Updated on

बारामती: बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही, अशी गर्जना करणारे ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी अखेर आपली तलवार म्यान केली. सोमवारी (दि. ६) सकाळी बारामतीत वेगवान घडामोडी घडल्या. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हाके यांच्याशी चर्चा केली. त्यांची ही शिष्टाई फळाला आल्याचे स्पष्ट झाले.

Laxman Hake
Chakan Onion Market Rates: चाकण बाजारात कांद्याची आवक घटली; तरीही भाव स्थिरच

बारामतीत संपतराव टाकले यांच्या निवासस्थानी नामदार भरणे व हाके यांच्या चर्चा झाली. यावेळी पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर हे देखील बैठकीला उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा केलेला सर्वांगीण विकास, राज्याच्या विकासात त्यांचे असणारे योगदान लक्षात घेऊन हाके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती भरणे यांनी केली.

Laxman Hake
Pune Fish Price Rise: मासेमारी बंदीचा परिणाम; पुण्यात मासळीचे दर तेजीत कायम

बंद दाराआड त्यांची काही वेळ चर्चा झाली. हाके यांनी ती मान्य करत संयुक्त पत्रकार परिषद घेत पवार यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. दरम्यान गेल्या महिनाभरापासून हाके यांनी बारामतीची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असे सांगत रान उठवले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु सोमवारी सकाळी घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर हाके यांनी माघार घेतली. हाके यांनी केलेल्या सहकार्याबद्दल भरणे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news