Chakan Onion Market Rates: चाकण बाजारात कांद्याची आवक घटली; तरीही भाव स्थिरच

४,५०० क्विंटलने आवक कमी; निर्यात ठप्प व मागणी घटल्याचा परिणाम
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत मोठी घसरण झाली. तब्बल 4 हजार 500 क्विंटलने कांद्याची आवक घटूनही दरात वाढ झाली नाही. कांद्याची आवक घटूनही भाव स्थिरच राहिले.

Onion
Pune Fish Price Rise: मासेमारी बंदीचा परिणाम; पुण्यात मासळीचे दर तेजीत कायम

आखाती देशात युद्धस्थिती असल्याने कांद्याची निर्यात ठप्प असल्याने कांद्याचे दर यंदाच्या कांदा हंगामात अजूनही स्थिरच आहेत. कांदा उत्पादकांना अपेक्षित कांद्याची भाववाढ अद्याप झालेली नाही. त्यातच व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद असल्याने हॉटेल बंद आणि कामगार परतल्याने तरकारी मालाला देखील अपेक्षित उठाव नसल्याचे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. चाकण बाजारात पालेभाज्यांची आवक वाढून दरात घसरण झाली. एकूण उलाढाल 5 कोटी 85 लाख रुपये झाली.

Onion
Baramati Political Banner Controversy: बारामतीत वादग्रस्त फलकांमुळे राजकीय वातावरण तापले; अजितदादा समर्थक आक्रमक

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 5 हजार क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 5 हजार 500 क्विंटलने घटली; मात्र भाव 1300 रुपये प्रतिक्विंटलवरच स्थिर राहिले. बटाट्याची एकूण आवक 1250 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक किंचित वाढली. बटाट्याचा कमाल भाव 1300 रुपयांवरून 1200 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 40 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक घटून कामाल भाव 12 हजार रुपयांवरून 10 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 365 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून 5,500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Onion
Maharashtra Cooperative Online Registration: सहकारी संस्थांसाठी ऑनलाइन क्रांती; ‘आपले सरकार’ पोर्टलवरून नोंदणी आणि परवाना

शेतीमालाची आवक व बाजारभाव :

कांदा : एकूण आवक - 5000 क्विंटल. भाव क्र. 1 - 1,300 रुपये, भाव क्र. 2 - 1,000 रुपये, भाव क्र. 3 - 800. बटाटा : एकूण आवक - 1,250 क्विंटल. भाव क्र. 1 - 1,200 रुपये, भाव क्र. 2 - 800 रुपये, भाव क्र. 3 - 700 रुपये.

Onion
Pune Engineers Payment Issue: सुबे अभियंत्यांचे थकीत देयके; ठेकेदारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव :

टोमॅटो - 318 क्विंटल (800 ते 1,200 रुपये), कोबी - 240 क्विंटल (500 ते 700 ), फ्लॉवर - 188 क्विंटल (800 ते 1,400), वांगी - 90 क्विंटल (1,000 ते 1500), भेंडी - 84 क्विंटल (2,500 ते 4,000), दोडका - 57 क्विंटल (2,500 ते 3,500), कारली - 67 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा - 62 क्विंटल (1,000 ते 1,600), काकडी - 93 क्विंटल (1,000 ते 1,600), फरशी - 20 क्विंटल (3,000 ते 4,000), वालवड - 42 क्विंटल (3,000 ते 4,000), ढोबळी मिरची - 148 क्विंटल (2,000 ते 4,000), चवळी - 42 क्विंटल (1,500 ते 2,500), वाटाणा - 60 क्विंटल (5000 ते 6000), शेवगा - 35 क्विंटल (2,170 ते 2,500), गाजर - 57 क्विंटल (1,000 ते 2,000), गवार - 48 क्विंटल (5,000 ते 7,000), आले - 160 क्विंटल (3,000 ते 4,000).

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव :

मेथी - एकूण 14 हजार 175 जुड्या (600 ते 1000 रुपये), कोथिंबीर - एकूण 27 हजार 590 जुड्या (400 ते 700), शेपू - एकूण 2 हजार 545 जुड्या (800 ते 1000).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news