Baramati Political Banner Controversy: बारामतीत वादग्रस्त फलकांमुळे राजकीय वातावरण तापले; अजितदादा समर्थक आक्रमक

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीपूर्वीच खळबळ; स्थानिक राजकारणात नवे वादंग
Baramati Political Banner Controversy
Baramati Political Banner ControversyPudhari
Published on
Updated on

बारामती: शहरातील प्रशासकीय भवन परिसरात लावण्यात आलेल्या काही वादग्रस्त फलकांमुळे बारामतीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र दिसत आहे. “दादा” समर्थकांकडून हे फलक लावण्यात आल्याची माहिती समोर येत असून, त्यातून काही विशिष्ट नेत्यांविरोधात उघड निषेध व्यक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Baramati Political Banner Controversy
Maharashtra Cooperative Online Registration: सहकारी संस्थांसाठी ऑनलाइन क्रांती; ‘आपले सरकार’ पोर्टलवरून नोंदणी आणि परवाना

या फलकांवर “फक्त अजितदादांचे नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही – समस्त दादा प्रेमी,” असा स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Baramati Political Banner Controversy
Pune Engineers Payment Issue: सुबे अभियंत्यांचे थकीत देयके; ठेकेदारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वीच हे फलक झळकल्याने या घडामोडींना अधिकच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी अशा प्रकारच्या फलकांमुळे तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्रकरणावर नेतेमंडळी कोणती भूमिका घेतात, तसेच प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news