Pune Rave Party Raid Project X: पुणे ग्रामीणमध्ये ‘प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टीवर धाड; 156 तरुण-तरुणी ताब्यात

तुळापूर रिसॉर्टमध्ये पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेची कारवाई; दारू, गांजा व हुक्का फ्लेव्हर्स जप्त
Party
Partyfile photo
Published on
Updated on

महेंद्र कांबळे

पुणे: शहरातील पबमधील लेटनाइट आणि आफ्टर पार्टीचे फॅड आता शहरालगतच्या गावखेड्यांमध्ये पोहचले आहे. तुळापूरच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये पहाटेपर्यंत सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेने धाड टाकली. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत फोफावत चाललेल्या व्यसन आणि बेकायदा पार्टीसंस्कृतीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Party
Pune FDA Raid: पुणे–कोल्हापुरात FDA ची धडक कारवाई; 24.81 लाखांचा बेकायदेशीर औषधसाठा जप्त

तुळापूर येथील पार्टीतून पोलिसांनी लाखो रुपयांची दारू, गांजा, बंदी असलेले हुक्का फ्लेव्हर्स जप्त केले. मात्र, तेथील वास्तव पाहिले असता पार्टीमध्ये नशेत झिंगलेल्या तरुण-तरुणींसह अल्पवयीन मुला-मुलींचा देखील सहभाग आढळून आला. दरम्यान, रिसॉर्टच्या आड अशा बेकायदेशीर पार्ट्या नेमक्या किती ठिकाणी रंगतात? हा देखील प्रश्न ऐरणीवर आल आहे. गोपनीय पद्धतीने आयोजित केल्या जाणाऱ्या अशा पार्ट्यांचे ब्रँडिंग पार्ट्यांना नेहमीच हजर असणाऱ्या तरुण-तरुणींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाते. पार्टीत सहभागी झालेल्‍या १५६ तरुण-तरुणींना पोलिसांनी पकडल्यानंतर सर्वच पालकांची चिंता वाढवली आहे.

Party
Pune Rave Party Case Police Action: तुळापूर रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांचा मोठा निर्णय; तरुण-पालकांचे समुपदेशन होणार

शिक्षण आणि आयटी क्षेत्रामुळे देश-विदेशातील मोठ्या प्रमाणावर तरुण पुण्यात वास्तव्यास आहेत. पोलिसांनी शहरातील पब आणि हॉटेलांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शहराबाहेरील फार्महाऊस, रिसॉर्ट आणि खासगी जागांवरील विकेंड पार्ट्यांचे प्रमाण वाढल्याचे बोलले जाते. तुळापूर, मुळशी, पिरंगुट, वाघोली, लोणीकंद, खडकवासला आदी परिसरांत अशा पार्ट्यांची चर्चा नेहमीच असते. काही ठिकाणी मद्य, हुक्का आणि अमली पदार्थांचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जातो. तुळापूर कारवाईत परवान्याची मुदत संपल्यानंतरही पार्टी सुरू असल्याचे, अल्पवयीनांचा सहभाग, प्रतिबंधित हुक्का फ्लेव्हर्स आणि गांजा आढळल्याने आयोजक, रिसॉर्ट व्यवस्थापन आणि नियंत्रण यंत्रणांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Party
Pune Rickshaw Fare Hike Demand: सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालक आक्रमक; पुण्यात भाडेवाढीसाठी आंदोलनाचा इशारा

तरुणाई नशेच्या विळख्यात?

पुण्यात गेल्या काही वर्षांत एमडी, मेफेड्रॉन, गांजा, एलएसडी आणि कोकेनसारख्या अमली पदार्थांच्या जप्तीच्या घटना वाढल्या आहेत. रेव्ह पार्ट्या या अशा पदार्थांच्या वापरासाठी पोषक ठरत असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. शहरा बाहेरील पार्ट्यांवर नजर ठेवणे, परवान्यांची पडताळणी करणे, सोशल मीडियावरील गुप्त प्रचार रोखणे आणि अमली पदार्थांचा पुरवठा थांबविणे, ही पोलिसांसमोरील मोठी आव्हाने आहेत. तुळापूर कारवाईनंतर जिल्हा प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी अशा कार्यक्रमांवर अधिक कठोर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे. आयोजकांसह रिसॉर्टचालक, मद्यपुरवठादार आणि अमली पदार्थाच्या साखळीवर कारवाईची मागणी होत आहे.

Party
Pune IT Couple Divorce: दहा दिवसांतच दाम्पत्य विभक्त; पुणे न्यायालयाने एका दिवसात घटस्फोट मंजूर

‘प्रोजेक्ट एक्स’वरील छापा हा केवळ एका पार्टीवरील ॲक्शन नसून पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या रेव्ह कल्चरचा इशारा आहे. ग्रामीण भागात, डोंगराळ भागात सेकंड इन्कमसोर्सच्‍या नावाखाली आवर्जून असे फार्महाऊस बांधले जात आहेत. तेथे सर्रास अशा पार्ट्या चालतात का? याकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. या प्रकारांना वेळीच आळा घातला नाही, तर नशा आणि भरकटणारी तरुणाई, हे संकट अधिक गंभीर होईल.

ॲड. बाळासाहेब खोपडे, माजी ज्‍येष्ठ सरकारी वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news