Pune Rave Party Case Police Action: तुळापूर रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांचा मोठा निर्णय; तरुण-पालकांचे समुपदेशन होणार

कारवाईनंतर जनजागृतीवर भर; अल्पवयीनांच्या सहभागामुळे गंभीर चिंता व्यक्त
Counseling
CounselingPudhari
Published on
Updated on

पुणे: तुळापूर येथील फार्महाऊसवर आयोजित केलेल्या 'प्रोजेक्ट एक्स' रेव्ह पार्टी प्रकरणानंतर आता पोलिसांनी सहभागी तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात कारवाईदरम्यान आढळून आलेल्या तरुणांमध्ये काही अल्पवयीनांचाही समावेश असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिली.

Counseling
Pune Rickshaw Fare Hike Demand: सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालक आक्रमक; पुण्यात भाडेवाढीसाठी आंदोलनाचा इशारा

तुळापूर येथील फार्महाऊसवर झालेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेने पहाटे छापा टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत मद्यसाठा, गांजा, प्रतिबंधित हुक्का फ्लेव्हर्स आणि अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी आयोजक, बारटेंडर, डीजे ऑपरेटर, कर्मचारी तसेच पार्टीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींसह एकूण ७८ जणांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर इतर तरुण-तरुणींना सोडून देण्यात आले. या कारवाईनंतर पोलिसांनी काही तरुण-तरुणींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते.

Counseling
Pune IT Couple Divorce: दहा दिवसांतच दाम्पत्य विभक्त; पुणे न्यायालयाने एका दिवसात घटस्फोट मंजूर

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्यासोबत बैठक घेतली. शहर आणि जिल्ह्यात फार्महाऊस, रिसॉर्ट किंवा खासगी ठिकाणी आयोजित पार्ट्यांना परवानगी देताना पुणे पोलिसांशी अधिक प्रभावी समन्वय ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा कार्यक्रमांना परवानगी देताना संबंधित माहिती ई-मेलद्वारे पुणे पोलिसांना देण्यात यावी; जेणेकरून आवश्यक पोलिस बंदोबस्त, देखरेख आणि पडताळणी करता येईल, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आल्याचे समजते. परवानगी प्रक्रियेत विविध यंत्रणांमधील समन्वय वाढल्यास भविष्यात अशा बेकायदा पार्ट्यांवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Counseling
Land Records Department Promotion: भूमी अभिलेख विभागातील उपसंचालक नियुक्तीवर आक्षेप; पदोन्नती हक्कांची मागणी

जनजागृती आणि समुपदेशनावर पोलिसांचा भर

तुळापूर रेव्ह पार्टी प्रकरणामुळे अल्पवयीनांचा सहभाग, अमली पदार्थांचे कथित सेवन आणि नियमांचे उल्लंघन, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, कायदेशीर कारवाईसोबतच जनजागृती आणि समुपदेशनावरही पोलिसांचा भर राहणार आहे. आपल्या मुलांनी अवैध कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये तसेच ते उशिरापर्यंत कुठे जातात आणि काय करतात, यावर पालकांनी लक्ष ठेवावे, या उद्देशाने हे समुपदेशन घेण्यात येणार आहे.

Counseling
Pigmy Agent Commission: पिग्मी एजंट कमिशन २.५% वर मर्यादित; सहकार क्षेत्रात नाराजी

१५६ जण सापडले, गुन्हे फक्त ७८ जणांवरच का?

तुळापूर रेव्ह पार्टी प्रकरणात छाप्यात १५६ जण आढळले; मात्र गुन्हे केवळ ७८ जणांवरच दाखल झाल्याने संशय निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. उर्वरित व्यक्तींमध्ये आमदार, खासदार, उद्योगपती किंवा प्रभावशाली व्यक्ती होत्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या परवानगीची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणीही त्यांनी केली. तुळापूरसारख्या ऐतिहासिक परिसरात अशा पार्ट्या होणे गंभीर असल्याचे त्या म्हणाल्या.

logo
Pudhari News
pudhari.news