Pune Crime: रांजणगावमध्ये 11 महिन्यांच्या बाळाचा खून; आईला अटक

दुसऱ्या लग्नाच्या अडथळ्यामुळे संतापजनक कृत्य; पोलिस तपासात उघडकीस
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

पुणे: दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून आईने आपल्या पोटच्या अकरा महिन्यांच्या मुलाचा कपडे धुण्याच्या ओट्यावर आपटून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दगडासह एका पिशवीत टाकून विहिरीत फेकून दिला.

Crime
Maharashtra Sports Grace Marks SSC HSC: क्रीडा सवलतीचे गुण अंतिम टप्प्यात; खेळाडू विद्यार्थ्यांना दिलासा

रांजणगाव एमआडीसी पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक तपास करून या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी महिलेला अटक केली आहे. यश रवींद्र पवार (वय 11 महिने, रा. भांबार्डे) असे खून झालेल्या लहान मुलाचे नाव आहे, तर याप्रकरणी पोलिसांनी पूजा रवींद्र पवार (वय 22) हिला अटक केली आहे.

Crime
Sharad Jare: राज्याच्या पणन संचालकपदी शरद जरे यांची नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मार्च रोजी रवींद्र पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांची पत्नी पूजा ही मुलगा यश याच्यासह घरातून निघून गेली आहे. पोलिस तिचा शोध घेत होते. दरम्यान, 5 एप्रिल रोजी पूजा जांबूत गावच्या हद्दीत मिळून आली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली तेव्हा तिने सांगितले, 8 मार्च रोजी मी झोपेत असताना माझा मुलगा ओट्यावरून पडल्याने मेला. त्यामुळे मी घाबरून त्याचा मृतदेह पिशवीत भरून विहिरीत टाकून दिला. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

Crime
Pune Pataleshwar Caves QR code: पाताळेश्वर लेणी ‘बोलू’ लागली; क्यूआर कोडमुळे इतिहास ऐकता येणार

पोलिसांचा प्राथमिक तपास आणि शवविच्छेदन अहवालात काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी पूजाकडे कौशल्यपूर्वक तपास केला. त्या वेळी तिने सांगितले की, मुलगा यश हा नेहमीच किरकीर करून रडतो. त्यामुळे कोठेतरी जाऊन दुसरा चांगला नवरा पाहून लग्न करावे. मात्र, मुलगा सोबत घेऊन गेल्याने कोणी लग्न करणार नाही, असा विचार आल्याने मुलाचे डोके कपडे धुण्याच्या ओट्यावर आदळून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह कपड्याच्या पिशवीत भरून विहिरीत टाकला. पिशवी बुडून राहण्यासाठी त्यामध्ये दोन दगड ठेवले.

Crime
Pune Student Food Crisis: इराण-इस्रायल युद्धाचे पडसाद; पुण्यात विद्यार्थ्यांचे ‘अळणी’ जीवन

याप्रकरणी पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली आहे. पूजाचे रवींद्रसोबत दुसरे लग्न असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, कर्मचारी विलास आंबेकर, नितीन भोस, किशोर शिवणकर, नीलम जाधव यांच्या पथकाने पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news