Pune Pataleshwar Caves QR code: पाताळेश्वर लेणी ‘बोलू’ लागली; क्यूआर कोडमुळे इतिहास ऐकता येणार

भारतीय पुरातत्व विभागाचा उपक्रम; नंदीमंडप दुरुस्तीसाठी 60 लाखांचा निधी मंजूर
Pataleshwar Caves
Pataleshwar CavesPudhari
Published on
Updated on

पुणे: “मी पाताळेश्वर लेणी... माझा जन्म आठव्या शतकात झाला... पाताळेश्वर, पांचाळेश्वर अशी नावे मला आहेत. पूर्वी माझ्यापर्यंत येण्यासाठी बोगद्यातून यावे लागे... पण आज तो मार्ग भिंतीत गेला आहे...” हे बोल आहेत साक्षात पाताळेश्वर लेणीचे! मंगळवारी ती स्वतः बोलली अन्‌‍ टाळ्यांचा कडकडाट झाला.

Pataleshwar Caves
Pune Student Food Crisis: इराण-इस्रायल युद्धाचे पडसाद; पुण्यात विद्यार्थ्यांचे ‘अळणी’ जीवन

सोमवारी 7 मार्च रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई सर्कलच्या वतीने पाताळेश्वर लेणीत क्यूआर कोड यंत्रणा बसविण्यात आली. भारतीय पुरातत्व विभागाच्या दक्षिण भारताचे संचालक नवरत्नकुमार पाठक यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या वेळी मुंबईतील उपअधीक्षक संजय मंडल, अधिकारी रविराज, बाबासाहेब जंगले, पाताळेश्वरचे प्रमुख गजानन मंडावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Pataleshwar Caves
Pune Municipal Corporation Gun Ban: महापालिकेत पिस्तूल आणल्यास नगरसेवक पद गमवाल; आयुक्तांचा कडक इशारा

लेणी नेमकी कुणी तयार केली..?

पाताळेश्वर लेणी नेमकी कधी अन्‌‍ कोणी बांधली? याचा नेमका इतिहास अजूनही उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यटक गोंधळून जातात. त्यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला. सध्या पाताळेश्वराची थोडीच माहिती ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Pataleshwar Caves
Shapoorji Pallonji Hadapsar Project Delay: पुण्यात ‘शापूरजी पालनजी’ प्रकल्प रखडला; घरखरेदीदारांचा आंदोलनाचा इशारा

ती नेमकी कोणी बांधली? याची अजूनही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वेरुळची लेणी तयार केली त्या राजा कृष्णदेवराय यांनी केली की इतर कुणी? याबाबत पुरावे उपलब्ध नाहीत. लेणी 7 व्या किंवा 8व्या शतकातील आहे. अनेक शतके ती मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेली होती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pataleshwar Caves
Pune Tanker Accident: पुण्यातील रस्त्यांवर टँकरची दहशत; वानवडीत इंजिनिअर तरुणीचा मृत्यू, दोन दिवसांत अपघाताची दुसरी घटना

नंदीमंडपाचे काम लवकरच होणार...

या ठिकाणी महाकाय दगडांचा भव्य नंदीमंडप आहे. तो ढासळत असल्याने पर्यटकांना धोका आहे. याचे काम कधी होणार? या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे 60 लाख रुपये बजेट त्यासाठी मंजूर झाले असून, आगामी 6 महिन्यांत शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news