Pune Ram Navami: शहरातील मंदिरांमध्ये ‌जय श्री राम‌चा जयघोष

मिरवणुका, कीर्तन-भजन आणि रामजन्म सोहळ्यांनी शहर भक्तिमय; मंदिरांत भाविकांची गर्दी
Pune Ram Navami
Pune Ram NavamiPudhari
Published on
Updated on

पुणे : श्री रामजन्माच्या कीर्तनाने प्रसन्न झालेले वातावरण, दुपारी मंदिरांमध्ये झालेला श्री रामजन्म सोहळा, भक्तांची दर्शनासाठी गर्दी अन्‌‍ सगळीकडे दुमदुमलेला ‌‘जय श्री राम‌’ चा जयघोष असे भक्तिपूर्ण वातावरण गुरुवारी शहर आणि उपनगरांत श्री रामनवमीच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

Pune Ram Navami
Indian Theatre Social Media: सोशल मीडियामुळे भारतीय रंगभूमी जागतिक झोतात; नाट्यप्रचाराला डिजिटल बळ

भक्ती, परंपरा आणि उत्साहाच्या संगमाने पुणे शहर रंगून गेले. फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंदिरांमध्ये पाहायला मिळाली. भक्तांनी फुलांची उधळण करत श्री राम जन्मसोहळा अनुभवला. भगवे झेंडे, ढोल- ताशा पथक, बॅण्ड पथकांचे उत्कृष्ट वादन, पारंपरिक वेशभूषेत श्री रामचा जयघोष करणारे कार्यकर्ते आणि विविध प्रकारचे रथ... अशा उत्साही वातावरणात मिरवणुका काढण्यात आल्या. त्यात भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकांमध्ये रामायणातील प्रसंगांचे देखावे सादर करण्यात आले होते. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

Pune Ram Navami
Daund Illegal Pistol: दौंडमध्ये मध्यरात्री धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्तुलसह दोघे जेरबंद

शहरातील मध्यवर्ती पेठांसह कात्रज, सहकारनगर, शिवाजीनगर, हडपसर, कोथरूड अशा विविध भागांतील मंदिरांमध्ये श्री रामनवमीचा उत्साह होता. मंदिरांमध्ये श्री रामजन्माचे कीर्तन, अभिषेक, महाआरतीसह दुपारी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात आणि श्री रामनामाचा नामघोष करत जन्मसोहळा साजरा झाला. यानिमित्ताने गीत रामायण कार्यक्रम, भजन-कीर्तन, प्रवचन, व्याख्याने आणि भक्तिगीतांचे कार्यक्रमही झाले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. घराघरांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा झाली. गणेश मंडळे आणि विविध संस्थांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मिरवणुकांमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरुणाईने सोशल मीडियावर श्री रामनवमीचे छायाचित्रे, व्हिडीओ तरुणांनी शेअर केले.

Pune Ram Navami
Ekvira Devi Palkhi: एकवीरा देवी पालखी यात्रेनंतर दोन गटांत तुफान हाणामारी; दगडफेकीत तणाव

अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समितीतर्फे समर्थ युवा फाउंडेशन आणि नूमवि वाद्यपथकाच्या सहकार्याने चार दिवसीय विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 1142 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच उत्सवाच्या दिवशी मिरवणूकही काढण्यात आली. कोंढवा खुर्दमधील श्री संकट हरण महादेव मंदिराच्या आवारातील श्रीराम दरबारमध्ये श्री राम नवमी साजरी करण्यात आली. मंदिरात दुपारी 12 वाजता श्री रामजन्म सोहळा पार पडला.

Pune Ram Navami
Jowar Price Saswad: सासवड बाजारात ज्वारीला विक्रमी दर; प्रतिक्विंटल ४८०० रुपयांपर्यंत भाव

कसबा पेठेतील श्री राममंदिरात श्री राम जन्म सोहळा

कसबा पेठेतील श्रीराम मंदिरात (चव्हाण) पारंपरिक पद्धतीने श्री राम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी श्री राम जन्म कीर्तन व श्री राम भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अंजली कऱ्हाडकर यांनी कीर्तन, तर डॉ. अनघा धायगुडे, प्रणव तडवळकर, विद्या यंदे, तनुजा चव्हाण यांनी भक्तिगीते सादर केली. श्री राम जन्मोत्सवानिमित्त नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news