Jowar Price Saswad: सासवड बाजारात ज्वारीला विक्रमी दर; प्रतिक्विंटल ४८०० रुपयांपर्यंत भाव

नीरा बाजार समितीत दरात वाढ; गुळालाही ४६०० रुपयांपर्यंत दर मिळाला
Jowar
JowarPudhari
Published on
Updated on

सासवड : पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता पुरंदर) येथील उपबाजारात बुधवारी (दि. 25) ज्वारीस प्रतिक्विंटल सर्वाधिक 4 हजार 800 रुपयांचा दर मिळाल्याची माहिती सभापती संदीप फडतरे यांनी दिली

Jowar
Baramati Politics: अजितदादांनंतर नेत्यांना ‌‘ग्राऊंड लेव्हल‌’वरच झुंजावे लागणार!

एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल 4 हजार 800 रुपये, तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान 3 हजार 300 हजार रुपये, तर सरासरी 4 हजार 50 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. यावेळी उपसभापती बाळासाहेब शिंदे, सचिव मिलिंद जगताप, संचालक शरद जगताप, महादेव टिळेकर, वामन भाऊ कामठे, गणेश होले, देविदास कामठे, सुशांत कांबळे, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, शरयू वाबळे, भाऊसाहेब गुलदगड, संचालिका शहजान शेख, लिपीक विकास कांबळे यांसह व्यापारी आर. के. ट्रेडर्सचे रुपचंद कांडगे, आर. आर. ट्रेडर्सचे राजेंद्र जळिंद्रे, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, शैलेश वीरकर आदी उपस्थित होते.

Jowar
Biogas Alternative: एलपीजी टंचाईवर उपाय; घरगुती बायोगॅस ठरू शकतो शाश्वत पर्याय

सोमवारी (दि. 23) कृषी उत्पन्न बाजार समिती निरा बाजारात गुळाची आवक 300 बॉक्स 75 क्विंटल झाली. किमान दर 4 हजार 400 रुपये, तर कमाल दर 4 हजार 600 रुपये इतका होता, अशी माहिती गूळबाजाराचे सहसचिव नितीन किकले, कृष्णात खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. यावेळी गूळ व्यापारी शांतिकुमार कोठडिया उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news