Pune Railway Station Redevelopment: पुणे रेल्वेस्टेशनवर सहा नवे प्लॅटफॉर्म; मालधक्का बाजूने एंट्री-एक्झिट

पुणे रेल्वेस्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी यार्ड रिमॉडलिंग प्रकल्पांतर्गत सहा नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार असून मालधक्का चौकातून स्वतंत्र प्रवेशमार्ग दिला जाणार आहे.
Pune Railway Station
Pune Railway StationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे रेल्वेस्टेशनवरील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता रेल्वे प्रशासन यार्ड रिमॉडलिंग प्रकल्पांतर्गत आता सहा नवीन प्लॅटफॉर्मची उभारणी करीत आहे. या नव्या प्लॅटफॉर्मसाठी आता थेट मालधक्का चौकातून स्वतंत्र एंट्री (प्रवेश) आणि एक्झिट (बाहेर पडण्याचा मार्ग) देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासोबतच मालधक्क्याकडून स्टेशनकडे येणाऱ्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरणही केले जाणार असून, यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानिक प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा सुरू केली आहे.

Pune Railway Station
Pune Sarasbaug Closed: पुण्यात सारसबाग उद्यान 28-29 मे रोजी बंद; सुरक्षा कारणामुळे निर्णय

पुणे रेल्वेस्टेशनच्या भव्य पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नवीन इमारत बांधणी, भव्य होल्डिंग एरिया आणि यार्ड रिमॉडलिंगअंतर्गत सहा नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी केली जात आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात मोठा मास्टर प्लॅन तयार केला असून, त्यानुसार आता पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होत आहे.

Pune Railway Station
Pune Land Records Office Division: पुणे भूमी अभिलेख विभागाचे उत्तर-दक्षिण विभाजन; दोन नवी नगर भूमापन कार्यालये

यात यार्डातील जुन्या इमारतींचे पाडकाम करण्यात आले असून, नव्या 11 आणि 12 प्लॅटफॉर्म बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रेल्वेच्या या नवीन नियोजनामुळे मालधक्का चौकाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना मुख्य स्टेशनवर न जाता थेट नव्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करता येईल, त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.

Pune Railway Station
Pune RTO Minor Driving Rules: अल्पवयीन मुलांना वाहन दिल्यास पालकांवर कारवाईचा बडगा

नेमके नियोजन काय?

  • स्थानकाचा विस्तार करताना नव्या प्लॅटफॉर्मसाठी मालधक्का चौकातून थेट कनेक्टिव्हिटी दिली जाईल.

  • स्टेशन परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या मदतीने रस्त्यांची रुंदी वाढवली जाणार आहे.

  • पायाभूत सुविधा आणि नवीन आरओबी उभारणीसाठी एसटी बसस्थानकाच्या जागा मिळविण्याबाबतही बोलणी सुरू आहेत.https://youtu.be/yNe3w7-6Hjo?si=_1z0ZLm7FF9iH3lI

Pune Railway Station
Pune Water Supply Issues: पुण्यात दूषित पाणीपुरवठ्यावरून प्रशासनाला स्थायी समितीत धारेवर

यार्ड रिमॉडलिंगअंतर्गत आम्ही यार्डात आणखी सहा नवीन प्लॅटफॉर्मची उभारणी करीत आहोत. या नव्या प्लॅटफॉर्मचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. हे प्लॅटफॉर्म झाल्यावर प्रवाशांना येथे लगेच प्रवेश करता येईल, यासाठी मालधक्का परिसरातच एंट्री आणि एक्झिट करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कामकाज केले जाणार आहे.

राजेशकुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), मध्य रेल्वे, पुणे विभाग

logo
Pudhari News
pudhari.news