Pune RTO Minor Driving Rules: अल्पवयीन मुलांना वाहन दिल्यास पालकांवर कारवाईचा बडगा

पुणे RTOचा कडक इशारा; 25 हजार दंडासह तुरुंगवासाचीही तरतूद
Minor Driving
Minor DrivingPudhari
Published on
Updated on

पुणे: तुमचा मुलगा किंवा मुलगी अजून 18 वर्षांची झाली नाही आणि तुम्ही कौतुकाने किंवा सोयीसाठी त्यांच्या हातात गाडीची चावी देत असाल, तर वेळीच सावध व्हा. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे आता पालकांसाठी प्रचंड महागात पडू शकते.

Minor Driving
Pune Water Supply Issues: पुण्यात दूषित पाणीपुरवठ्यावरून प्रशासनाला स्थायी समितीत धारेवर

पुणे आरटीओने (प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे) अशा निष्काळजी पालकांवर अत्यंत कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिल्यास 25 हजार रुपयांचा दंड आणि थेट पालकांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा आरटीओ प्रशासनाने दिला आहे.

Minor Driving
Milindnagar SRA Scam: मिलिंदनगर एसआरए प्रकरणात नियमबाह्य मंजुरीचा आरोप

गेल्या काही दिवसांत अल्पवयीन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अल्पवयीन मुलांनी स्टंट केलेले आणि सुसाट वेगाने गाड्या चालवलेले व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत, पुणे आरटीओने हे कडक पाऊल उचलले आहे.

Minor Driving
Expired Medicines In CGHS Dispensary: सीजीएचएस फुलेनगर डिस्पेन्सरीत एक्सपायर्ड औषधांचा धक्कादायक प्रकार

पालकांनी ही घ्यावी काळजी

  • मुले हट्ट करतात म्हणून किंवा जवळच जायचे आहे म्हणून त्यांच्या हातात दुचाकी किंवा चारचाकी वाहने देऊ नका.

  • अपरिपक्व वयात वाहन चालवल्यामुळे स्वतः मुलाचा आणि रस्त्यावरील इतर निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येतो.

  • वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्याशिवाय मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवू देऊ नका.

Minor Driving
NDA Passing Out Parade 2026: एनडीए परेडमध्ये दिसणार ‘सारंग’चा थरार! आकाशात रंगणार हवाई कसरतींचा नेत्रदीपक शो

अल्पवयीन मुला-मुलींना वाहन चालवण्यास देणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे केल्यास 25 हजार रुपये दंडच नाही, तर थेट पालकांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल. पालकांनी या नियमाचे गांभीर्य ओळखावे. मुलांचे कौतुक क्षणिक असते; पण एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला कायदेशीर कारवाईला आणि मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ‌‘स्मार्ट‌’ बना आणि आपल्या अल्पवयीन मुलांना वाहनांपासून दूर ठेवा.

स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news