Pune Rabies Vaccine Dog Bite: श्वान चावल्यानंतर २४ तासांत लस घ्या; पुण्यात मोफत रेबीज उपचार उपलब्ध

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अँटी रेबीज लस मोफत; उशीर झाल्यास जीवाला धोका, तज्ज्ञांचा इशारा
Rabies Vaccine
Rabies VaccinePudhari
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: माणसाला श्वान चावल्यास तातडीने रेबीज प्रतिबंधात्मक लस दिली जाते. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयासह सर्व प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांमध्ये इंजेक्शन मोफत उपलब्ध आहेत. श्वान चावल्यापासून जखमेची तीवता लक्षात घेऊन 24 तासांच्या आत इंजेक्शन घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये दरमहा रेबीज प्रतिबंधात्मक लसीचे 1600-2000 डोस लागतात.

Rabies Vaccine
Pune Hydroponic Ganja Smuggling: पुणे विमानतळ ‘हायड्रोपोनिक गांजा’ तस्करीचे हॉटस्पॉट बनले

रेबीज हा जीवघेणा आजार असून एखाद्या व्यक्तीला प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीज झाल्यास मृत्यूचाही धोका संभवतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, 150 देशांमध्ये 59 हजार लोक रेबीजमुळे आपला जीव गमावतात. यातील सर्वाधिक मृत्यू आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये होतात. श्वान चावल्यावर वेळीच रेबीज प्रतिबंधात्मक लस दिल्यास माणसाच्या जीवाला निर्माण होणारा धोका टाळता येऊ शकतो. चावलेल्या श्वानाला रेबीज झाला असल्यास किंवा त्याचे लसीकरण झाले नसल्यास धोका वाढतो. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे 60 हजार रेबीज प्रतिबंधात्मक लसींची गरज भासते. महापालिका, जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्थानिक पातळीवर निविदा काढून लसींची खरेदी केली जाते.

Rabies Vaccine
India MSME Crisis: अमेरिका-इराण संघर्षाचा भारतावर मोठा परिणाम; 11 कोटी रोजगार धोक्यात

माणसामध्ये लस कशी काम करते?

रेबीज प्रतिबंधात्मक लस माणसाच्या शरीरात गेल्यानंतर ती प्रत्यक्ष विषाणूशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करते. या लसीमध्ये निष्क्रिय (मारलेला) रेबीज विषाणू असतो, त्यामुळे आजार होत नाही; मात्र शरीर त्याला ओळखून त्याविरुद्ध प्रतिपिंडे तयार करते. लस घेतल्यानंतर काही दिवसांत ही प्रतिपिंडे तयार होतात आणि मेंदूपर्यंत पोहोचण्याआधीच विषाणूचा नाश करतात. विशेषतः प्राण्याच्या चाव्यानंतर दिली जाणारी पोस्ट-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस ही उपचारपद्धती वेळेत घेतल्यास रेबीजसारख्या जीवघेण्या रेबीज आजारापासून पूर्ण संरक्षण मिळू शकते. त्यामुळे चावा लागल्यानंतर त्वरित लस घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

श्वानांसाठी लस कशी काम करते?

श्वानांना रेबीज प्रतिबंधात्मक लस दिल्यानंतर ती त्यांच्या रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय करते. या लसीमध्ये निष्क्रिय विषाणू असतो, त्यामुळे श्वानाला आजार होत नाही; पण शरीर त्या विषाणूला ओळखायला शिकते. लस दिल्यानंतर श्वानाच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होतात, जी भविष्यात खरा विषाणू शरीरात प्रवेश केल्यास त्याचा वेगाने नाश करतात. त्यामुळे प्राणघातक आजार होण्यापासून कुत्र्यांचे संरक्षण होते. नियमित लसीकरण (प्राथमिक डोस आणि बूस्टर डोस) केल्यास ही संरक्षणात्मक क्षमता टिकून राहते आणि संसर्गाचा प्रसारही रोखला जातो.

Rabies Vaccine
Purandar International Airport Funding Delay: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ निधीअभावी रखडला; 6 हजार कोटींची प्रतीक्षा

खासगी रुग्णालयात एआरव्ही इंजेक्शनसाठी लागतात 400 रुपये

महापालिकेचे सर्व दवाखाने आणि प्रसूतीगृहांमध्ये रेबीज वरील लस मोफत दिली जाते रेबीजच्या लसीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार महापालिका एक लस साधारणपणे सव्वाशे ते दीडशे रुपयांना खरेदी करते. खासगी रुग्णालयांमध्ये एका इंजेक्शनची किंमत 300-400 रुपये असल्याचे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

कसे होतात श्वानदंशावर लसीकरण?

कुत्रा चावल्यानंतर जखमेची वर्गवारी खरचटणे ते खोल जखम यानुसार वर्ग 1 ते 4 मध्ये केली जाते. रेबीजचा विषाणू मज्जारज्जूमधून प्रवास करतो. त्याच्या प्रवासाचा वेग जितका जास्त असेल तितका धोका वाढतो. नखे लागल्याने उमटलेले किरकोळ वण, खरचटणे, छोटीशी जखम अशा स्थितीमध्ये एआरव्ही लसीचे 3 किंवा 5 इंजेक्शनचे डोस दिले जातात. यामध्ये 0, 7, 14, 28 अशा दिवसांचे अंतर आवश्यकतेनुसार ठेवले जाते. जखम खोल असेल किंवा मेंदूपासून जवळ असलेल्या अवयवाला श्वानदंश झाला असेल तर अँटीबॉडी वेगाने तयार व्हाव्यात, यासाठी जखमेच्या जागी इंजेक्शन दिले जाते. जखमेची तीवता ध्यानात घेऊन कुत्रा चावल्यापासून 24 तासांच्या आत इम्युनोग्लोब्युलिनचे एक किंवा दोन डोस दिले जातात.

Rabies Vaccine
Pune Zilla Parishad Chairman Election: जिल्हा परिषदेत सभापतिपदासाठी चुरस; 2 एप्रिलच्या निवडणुकीकडे लक्ष

पुणे जिल्ह्यातील रेबीजमुळे झालेले मृत्यू

माणसांमध्ये रेबीजची लागण झाल्यावर त्याला सांसर्गिक रुग्णालयात दाखल करावे लागते. पुणे जिल्ह्यामध्ये नायडू सांसर्गिक रुग्णालय हे एकमेव संसर्गजन्य आजारांचे रुग्णालय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेबीजची लागण झालेले सर्व रुग्ण नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल केले जातात. प्रस्तुत आकडेवारीपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू पुणे शहरातील नाही.

श्वानाला रेबीज कसा होतो?

संक्रमित प्राण्याच्या (श्वान, मांजर, वटवाघूळ) चाव्यामुळे विषाणू शरीरात प्रवेश करतो. चाव्यामुळे झालेल्या जखमेतून विषाणू थेट रक्तात किंवा ऊतींमध्ये जातो. संक्रमित प्राण्याची लाळ उघड्या जखमेवर लागली तरी संसर्ग होऊ शकतो. विषाणू हळूहळू मज्जासंस्थेत (नर्व्हस सिस्टीम) पसरतो. मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर गंभीर लक्षणे दिसू लागतात.

श्वानदंशानंतर दिली जाणारी इंजेक्शन महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये अँटी रेबीज इंजेक्शनची किंमत साधारणपणे 300 ते 400 रुपये, तर इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शनची किंमत 4000 रुपयांपासून सुरू होते. जखम खोलवर असेल किंवा रक्त आले असेल तर लसीसह इम्युनोग्लोब्युलिन सीरम दिले जाते.

डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news