Pune Hydroponic Ganja Smuggling: पुणे विमानतळ ‘हायड्रोपोनिक गांजा’ तस्करीचे हॉटस्पॉट बनले

थायलंडमध्ये विक्रीवर निर्बंधानंतर पुण्यात वाढली हायड्रोपोनिक गांजाची तस्करी; कस्टम विभागाने जप्त केला ४० कोटींहून अधिकचा गांजा
Hydroponic Ganja
Hydroponic GanjaPudhari
Published on
Updated on

महेंद्र कांबळे

पुणे: एकेकाळी थायलंडमध्ये किराणा मालाच्या वस्तूंप्रमाणे सहज उपलब्ध होणारा हायड्रोपोनिक गांजा आता भारतीयांसह परदेशी नागरिकांना देणे बंद करण्यात आल्यामुळे गांजाचा हा वाढलेला साठा आता तस्करीच्या मार्गाने थेट पुण्यात पोहोचू लागला आहे. पुणे कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या (एआययू) कारवायांमधून वाढत्या तस्करीचे हे चित्र समोर आले आहे. त्यामुळेच पुणे विमानतळ हे आता हायड्रोपोनिक गांजाचे हॉटस्पॉट ठरत आहे.

Hydroponic Ganja
India MSME Crisis: अमेरिका-इराण संघर्षाचा भारतावर मोठा परिणाम; 11 कोटी रोजगार धोक्यात

कॅनॅबिस (गांजा) ही वनस्पती थायलंडने कायदेशीर केल्यानंतर बँकॉकमध्ये हायड्रोपोनिक गांजाचे मोठे उत्पादन होऊ लागले. त्यामुळे तो रस्त्यावरील दुकानांमधून सर्रास उपलब्ध होऊ लागला. कोणालाही तो विकत घेता येत असे. मात्र, जून 2025 पासून थायलंड सरकारने गांजाच्या विक्रीवर निर्बंध लादले. वैद्यकीय कारणास्तव आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर तो दिला जाऊ लागला. त्यामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेला हा हायड्रोपॉनिक गांजा चोरट्या मार्गाने पुण्यात येऊ लागला.

Hydroponic Ganja
Purandar International Airport Funding Delay: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ निधीअभावी रखडला; 6 हजार कोटींची प्रतीक्षा

कस्टम विभागाने गेल्या वर्षभरात दहाहून अधिक कारवाया करत पंधरापेक्षा जास्त गांजा तस्करांना अटक केली आहे. तसेच खुल्या बाजारात 40 कोटी रुपये किंमत असलेला गांजाही जप्त केला. पूर्वीच्या सोन्याच्या तस्करीची जागा आता गांजा तस्करांनी घेतली असल्याचे कस्टम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. खेळणी, चॉकलेट, बाथरूम कॅबिनेट, अशा विविध क्लृप्त्या लढवून त्यात गांजा लपवून हा माल आणला जात असल्याने तो शोधून काढण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. त्यामुळे प्रोफाइलिंग इंटेलिजन्स आणि तांत्रिक तपासणी अधिक मजबूत करण्यावर कस्टम विभागाने भर दिला आहे. याद्वारे विशिष्ट प्रवाशांवर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात येत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Hydroponic Ganja
Pune Zilla Parishad Chairman Election: जिल्हा परिषदेत सभापतिपदासाठी चुरस; 2 एप्रिलच्या निवडणुकीकडे लक्ष

2025-2026 मधील गांजावरील प्रमुख कारवाया

  • 27 जुलै 2025 : 10 किलो (रु. 10 कोटी) जप्त

  • 6 ऑगस्ट 2025 : 6 किलो (रु. 6 कोटींहून अधिक) गांजा पकडला

  • 6 डिसेंबर 2025 : 722 ग््रॉम (रु. 72 लाख) गांजा चिप्सच्या बंद डब्यात आढळला

  • 8 डिसेंबर 2025 : 2,299 ग््रॉम (रु. 2.29 कोटी) गांजा जप्त

  • फेबुवारी : 5.429 किलो (रु. 5.42 कोटी) गांजा जप्त

  • 3 मार्च : 745 ग््रॉम (रु. 74.5 लाख) बाथरूम टिश्यू केबिनेटमध्ये सापडला

  • 7 मार्च : 8.710 किलो (रु. 8.71 कोटी) गांजा जप्त

Hydroponic Ganja
MPSC Group A B Recruitment: MPSC भरती 2026: गट ‘अ’ व ‘ब’ साठी 571 जागा; अर्ज प्रक्रिया सुरू

अशी होते तस्करी...

  • ड्रग्ज बॅगेत लपवणे

  • ड्रग्ज असलेली कॅप्सूल गिळून त्याची वाहतूक करणे

  • चॉकलेट, खेळणी, वस्तूंमध्ये लपवलेला माल घेऊन जाणे

हायड्रोपोनिक गांजा महाग का?

  • कृत्रिम वातावरणात तयार; उच्च दर्जा

  • सामान्य गांजापेक्षा अनेकपट महाग

  • आंतरराष्ट्रीय किंमत : प्रतिकिलो

  • रु. 80 लाख ते रु. 1 कोटी

  • पुणे ‌‘ट्रान्झिट पॉइंट‌’ बनण्याची शक्यता

कोणाचा होतो तस्करीसाठी वापर..

  • नोकरीच्या शोधात असलेले तरुण

  • आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्ती

हायड्रोपोनिक गांजा म्हणजे काय?

हायड्रोपोनिक गांजा म्हणजे पाण्यावर आधारित विशिष्ट पद्धतीने उगवण्यात आलेला गांजा. साधारण गांजाची शेती जमिनीवर केली जाते; पण या पद्धतीत झाडांना मातीऐवजी पाण्यातून पोषक द्रव्य (न्युट्रियंट्‌‍स) दिली जातात. ही झाडे नियंत्रित वातावरणात वाढवली जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news