Pune Property Tax 2026-27: पुणे महापालिकेचा 2026-27 मिळकत कर आराखडा: 3,352 कोटींचे उद्दिष्ट आणि थकबाकी वसुली योजना

3.5 लाख नोंद नसलेल्या मिळकतींची ओळख, अभय योजना आणि थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा आराखडा
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्याचा विस्तार झपाट्याने होत आहे. या विस्तारामुळे महापालिकेच्या यंत्रणेवर ताण येत आहे. महापालिका उत्पन्नवाढीसाठी झटत असताना दुसरीकडे मात्र मिळकत कर विभागाकडे शहरातील तब्बल 3 लाख 50 हजार मिळकतींची नोंदच नसल्याचे समोर आले आहे.

Property Tax
Pune Health Budget 2026-27: पुणे महापालिकेचा 2026-27 आरोग्य विभागाचा अर्थसंकल्प: नवीन रुग्णालये व वैद्यकीय सुविधा

यामुळे महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती स्वत: आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे या वर्षात त्या मिळकती शोधून त्यांना टॅक्स लावण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच थकबाकीदारांवर कठोर कारवाई करून थकीत रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Property Tax
Pune Municipal Budget 2026-27: पुणे महापालिकेचा 2026-27 अर्थसंकल्प: 13,995 कोटींचा विकासाचा आराखडा

आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी पुणे महापालिकेचा 2026-2027चा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला. या वर्षात महापालिकेने मिळकत कराचे तब्बल 3 हजार 352 कोटी 40 लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. या वर्षी थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना आणली असे असतानाही 2 हजार 147 कोटी रुपये मिळकत करातून महापालिकेला मिळाले आहेत. 31 मार्चपर्यंत मिळकत कराचे उद्दिष्ट गाठले जाईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

Property Tax
Purandar International Airport Land Acquisition: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाची तयारी पूर्ण

पुण्यात तब्बल 3 लाख 50 हजारांपेक्षा अधिक मिळकतींची नोंद महापालिकेकडे नाही. यामुळे महापालिकेचा तब्बल 17 हजार कोटी रुपयांचा मोठा महसूल बुडत आहे. यामुळे विकासकामे राबवण्यात मर्यादा येत आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात नोंद नसलेल्या मिळकतींची नोंद करण्यासाठी यंत्रणा सक्षम केली जाणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

Property Tax
Pune Women Conch Blowing World Record: पुण्यात 400 हून अधिक महिलांचा शंखनाद; जागतिक विक्रमाची नोंद

थकबाकी न भरलेल्या मिळकतींचा लिलाव

शहरात सुमारे साडेतीन लाख आकारणी न झालेल्या मिळकती आहेत. या मिळकतींची आकारणी करणे, न्यायालयीन वादात असलेल्या प्रकरणांत तडजोड करणे आणि अभय योजनेनंतरही थकबाकी न भरलेल्या मिळकतींचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्यास प्राधान्य देण्यात येईल. यापुढे थकबाकीदारांची गय केली जाणार नाही, असे मनपा आयुक्त नवल किशोर राम म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news