Pune Health Budget 2026-27: पुणे महापालिकेचा 2026-27 आरोग्य विभागाचा अर्थसंकल्प: नवीन रुग्णालये व वैद्यकीय सुविधा

कर्करोग रुग्णालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जेरियाट्रिक व आयव्हीएफ सेंटर, आणि डॉग शेल्टरसाठी प्रस्तावित तरतुदी
Hospital
HospitalPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या 2026-27 च्या अंदाजपत्रकात बाणेर येथील कर्करोग रुग्णालयात रेडिओ थेरपी प्रकल्प, वारजे येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय अशा वैद्यकीय सुविधांवर भर देण्यात आला आहे. वृद्धांसाठी जेरियाट्रिक केअर सेंटर, आयव्हीएफ सेंटरही उभारले जाणार आहे. मात्र, सर्व वैद्यकीय सुविधा पीपीपी तत्त्वावर चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेने आरोग्य सुविधांची कास खाजगी संस्थांच्या हातात दिल्याचे स्पष्ट होत आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना सुविधा मोफत मिळणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Hospital
Pune Municipal Budget 2026-27: पुणे महापालिकेचा 2026-27 अर्थसंकल्प: 13,995 कोटींचा विकासाचा आराखडा

महापालिकेच्या 2026-27 च्या अंदाजपत्रकात आरोग्य विभागाच्या आर्थिक तरतुदीतील बहुतांश निधी नव्या योजना सुरू करण्याऐवजी आधीच सुरू असलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठीच वापरला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, बहुतांश सुविधा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविल्या जाणार आहेत. प्रस्तावित दवाखाने आणि तपासणी केंद्रे खासगी कंपन्यांतर्फे चालवली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक आरोग्य सुविधेसाठी नागरिकांना काही प्रमाणात पैसे मोजावे लागणार आहेत.

Hospital
Purandar International Airport Land Acquisition: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाची तयारी पूर्ण

शहरी गरीब योजना आणि वैद्यकीय सहाय्य योजनेसाठी गेल्या वर्षी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा ही तरतूद 80 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रे, हिंदुहृदयसमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कमला नेहरू रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, तसेच अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार या प्रकल्पांना यंदाही प्राधान्य देण्यात आले आहे. पशुवैद्यकीय सुविधांतर्गत भटक्या कुर्त्यांवरील नियंत्रणासाठी डॉग शेल्टर उभारणी, फिडिंग पॉईंट, श्वान दवाखाना आणि रेबीज लसीकरण यावर भर देण्यात आला आहे.

Hospital
Pune Women Conch Blowing World Record: पुण्यात 400 हून अधिक महिलांचा शंखनाद; जागतिक विक्रमाची नोंद

किती तरतूद?

  • महापालिकेच्या अंदाजपत्रकात 2025-26 मध्ये आरोग्य विभागासाठी 569.89 कोटी रुपयांची महसुली तरतूद करण्यात आली होती. यंदा 2026-27 मध्ये महसुली व भांडवली मिळून 881.74 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

  • वैद्यकीय महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षासाठी 12.28 कोटी रुपयांची आवश्यक साधनसामग््राी आणि साहित्य खरेदी करण्यासाठी व मनुष्यबळ पुरवठासाठी निविदा प्रक्रिया.

  • वैद्यकीय महाविद्यालयाला 2026-2027 या वर्षात 76.86 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

Hospital
Pune University Double Decker Flyover: पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

प्रस्तावित प्रकल्प

  • बाणेर येथे कर्करोग रुग्णालयात लिनिअर एक्सलेरेटर रेडिओ थेरपी प्रकल्प (पीपीपी)

  • वारजे येथे 350 बेड्सचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल; 10 टक्के बेड मोफत आणि 6 टक्के सीजीएचएस दराने (पीपीपी)

  • प्रत्येक परिमंडळासाठी किमान एक अशी पाच डायग्नोस्टिक सेंटर (पीपीपी)

  • भूगाव आणि शिंदेवाडी येथे डॉग शेल्टर

  • अद्ययावत आणि सुसज्ज डॉग पार्क

  • भटक्या आणि मोकाट श्वानांसाठी फिडिंग पॉईंट

  • कमला नेहरू रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील उपकरणांसाठी 8 कोटी रुपये

  • अण्णासाहेब मगर रुग्णालयाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण (5 कोटी)

  • नायडू कॅम्पस येथे 14 मजली विद्यार्थी वसतिगृह, कर्मचारी सदनिका आणि संलग्न रुग्णालय

  • दिव्यांग मुलांसाठी विशेष देखभाल युनिट

  • कोल्ड चेन देखभाल व खरेदी करण्यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news