Pune School Stationary Action: खासगी शाळांना इशारा: पुस्तके व गणवेश खरेदीस सक्ती केल्यास कारवाई

पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाचे निर्देश; नियमभंग करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा
School
SchoolPudhari
Published on
Updated on

पुणे: खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना ठरावीक दुकानातूनच किंवा शाळेतूनच शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाते. या माध्यमातून पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते.

School
Pune Market Illegal Encroachment: पुणे बाजार समितीत G-56 जागांवर पुन्हा अनधिकृत व्यापार; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे खासगी शाळांनी शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती पालकांवर करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्राथमिकचे संचालक शरद गोसावी तसेच माध्यमिकचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला आहे.

School
Pune Municipal Budget: पुणे महापालिकेचा 15,669 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महसूल वाढीसाठी समिती स्थापन

दोन्ही संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार, सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. याबाबतच्या सूचना सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना द्याव्यात, याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट केले आहे.

School
Pune Illegal Hoardings: पुण्यात अनधिकृत होर्डिंग्जचा गोंधळ; 80 कोटी थकबाकी वसुलीचे आदेश

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई मंडळाशी संलग्न शाळांनी एनसीईआरटी तसेच बालभारतीची पाठ्यपुस्तके वापरावीत. अन्य मंडळांच्या शाळांनी त्या-त्या मंडळांनी प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तके वापरावीत. गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी कार्यालयाचा ई-मेल आयडी प्रसिद्ध करावा तसेच विषयाच्या अनुषंगाने नोडल अधिकारी यांची नेमणूक करावी, अशा स्पष्ट सूचना देखील गोसावी आणि डॉ. पालकर यांनी दिल्या आहेत.

School
Krishna Basin Water Level: कृष्णा खोऱ्यातील धरणांतील पाणी 34%वर; उन्हामुळे साठा झपाट्याने घट

सक्ती करणार नसल्याचा ठरावही घ्यावा

कोणत्याही शाळेने विशिष्ट खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करण्याचे बंधन तसेच सक्ती विद्यार्थ्यांना करू नये. खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात येणार नसल्याचा ठराव घेण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news