Pune Market Illegal Encroachment: पुणे बाजार समितीत G-56 जागांवर पुन्हा अनधिकृत व्यापार; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

कोट्यवधींच्या व्यवहाराचा संशय; कारवाईची मागणी
Pune Market Illegal Encroachment
Pune Market Illegal EncroachmentPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील वादग््रास्त जी-56 मोकळ्या जागांवर शासनाच्या आदेशाला हरताळ फासत संचालकांनी पुन्हा अनधिकृतपणे ताबा घेत व्यापार सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Market Illegal Encroachment
Pune Municipal Budget: पुणे महापालिकेचा 15,669 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महसूल वाढीसाठी समिती स्थापन

अधिवेशनादरम्यान कारवाई केल्याचा आभास निर्माण करून काही काळ व्यापार थांबविण्यात आला होता; मात्र अधिवेशन संपताच पुन्हा व्यवहार सुरू झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात बाजार समिती आणि संचालक यांच्यात संगनमत असल्याची चर्चा रंगली आहे.

Pune Market Illegal Encroachment
Pune Illegal Hoardings: पुण्यात अनधिकृत होर्डिंग्जचा गोंधळ; 80 कोटी थकबाकी वसुलीचे आदेश

जी-56 संदर्भात चौकशी करताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता अहवाल तयार केल्याचा आरोप बाजारातील घटकांनी केला आहे. फळे व भाजीपाला विभागातील या मोकळ्या जागा 150 ते 200 चौरस फुटांच्या असून, त्यासाठी 20 ते 50 हजार रुपये भाडे आकारले जात असल्याचे सांगितले जाते.

Pune Market Illegal Encroachment
Krishna Basin Water Level: कृष्णा खोऱ्यातील धरणांतील पाणी 34%वर; उन्हामुळे साठा झपाट्याने घट

मात्र, हा महसूल बाजार समितीकडे जमा न होता गेल्या अडीच वर्षांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्याचे नवनियुक्त पणन संचालक शरद जरे हे कडक अधिकारी म्हणून ओळखले जात असून, या प्रकरणात ते कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Pune Market Illegal Encroachment
Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत उपाध्यक्ष-विश्वस्त निवड पुढे ढकलली

बाजारातील मोकळ्या जी-56 जागांवर अनधिकृतपणे व्यवसायाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार, संबंधित विभागप्रमुख तसेच गटप्रमुखांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news