Pune Municipal Budget: पुणे महापालिकेचा 15,669 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महसूल वाढीसाठी समिती स्थापन

उत्पन्न वाढ, थकबाकी वसुलीवर भर; स्थायी समिती व प्रशासनाची संयुक्त पुढाकार
Budget
BudgetPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 15,669 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य सभेत मंजूर करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकातील अपेक्षित उत्पन्न साध्य करण्यासाठी, तसेच महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने स्थायी समिती सदस्य आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

Budget
Pune Illegal Hoardings: पुण्यात अनधिकृत होर्डिंग्जचा गोंधळ; 80 कोटी थकबाकी वसुलीचे आदेश

या समितीमध्ये स्थायी समितीतील काही निवडक सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यात श्रीनाथ भिमाले, विशाल धनावडे, संदीप बेलदरे, रूपाली धाडवे, मयूरी कोकाटे, प्रशांत जगताप आणि सुहास टिंगरे यांचा समावेश आहे. प्रशासनाच्या बाजूने महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी या समितीमध्ये सहभागी राहणार आहेत.

Budget
Krishna Basin Water Level: कृष्णा खोऱ्यातील धरणांतील पाणी 34%वर; उन्हामुळे साठा झपाट्याने घट

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करसंकलनात सुधारणा करणे, थकबाकी वसुलीला गती देणे, नवीन महसूल स्रोतांचा शोध घेणे, तसेच विविध आर्थिक उपाययोजनांचा आढावा घेणे, ही या समितीची प्रमुख जबाबदारी असेल. या माध्यमातून आर्थिक शिस्त मजबूत करत अंदाजपत्रकातील उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news