Pune Porsche Case: पुणे पोर्शे अपघात प्रकरण पुन्हा चर्चेत; विशाल अग्रवालचा डान्स व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

Pune Porsche Case Video Viral: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचा कथित डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
Pune Porsche Case Video Viral
Pune Porsche Case Video ViralPudhari
Published on
Updated on

Pune Porsche Case Video Viral: पुण्यातील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने पुन्हा एकदा वादळ निर्माण केलं आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल हा गळ्यात नोटांचा हार घालून नाचताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिनाभरापूर्वी जामिनावर सुटल्या नंतरचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अपघात प्रकरणातील संवेदनशीलता आणि न्यायप्रक्रिया यावर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण देशभरात गाजलं होतं. मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याचा आरोप होता. या भीषण अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात आरोपीला अल्पवयीन असल्यामुळे निबंध लिहिण्याची अट घालून जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त झाल्यानंतर तपासाला वेग आला आणि आरोपीच्या कुटुंबीयांसह इतर संबंधितांवरही कारवाई करण्यात आली होती.

Pune Porsche Case Video Viral
Byju Raveendran: Byju’s चे संस्थापक बायजू रवींद्रन यांना मोठा धक्का! सिंगापूर कोर्टाकडून 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा संताप

आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल हा नोटांचा हार घालून डान्स करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. अपघातासारखी गंभीर घटना घडल्यानंतर आणि तुरुंगवारी करूनही अशा प्रकारची वर्तणूक दिसत असल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? तो जामिनानंतरचाच आहे का? याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

Pune Porsche Case Video Viral
Delivery Rider: बेरोजगार ते महिन्याला 45 हजारांची कमाई; EV बाईकने बदललं डिलिव्हरी बॉयचं आयुष्य, व्हायरल स्टोरीमुळे चर्चा

पोलीस काय कारवाई करू शकतात?

या संदर्भात पोलीस अधिक माहिती गोळा करत असल्याची माहिती समोर येत आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी-शर्ती घातल्या होत्या का आणि त्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, याची तपासणी केली जाऊ शकते.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडून दोन निष्पाप तरुणांचा जीव गेल्यानंतरही संबंधित कुटुंबाच्या वर्तनावरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news