Pune Police Recruitment Women Priority: लहान बाळांसह येणाऱ्या महिला उमेदवारांना पोलिस भरतीत प्रथम प्राधान्य

पुणे शहर पोलिसांकडून शारीरिक व मैदानी चाचणीत विशेष सवलत; संजय पाटील यांची माहिती
Maharashtra police
Maharashtra policePudhari
Published on
Updated on

पुणे: पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या महिला उमेदवारांपैकी लहान बाळ सोबत असणाऱ्या महिला उमेदवारांच्या शारीरिक व मैदानी चाचणीस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी महिती अपर पोलिस आयुक्त प्रशासन संजय पाटील यांनी दिली आहे.

Maharashtra police
Sugar Industry Ethanol Quota Demand: साखर उद्योगासाठी 60 कोटी लिटर इथेनॉल कोटा वाढवण्याची केंद्राकडे मागणी

पुणे शहर पोलिस दलातील पोलिस शिपाई या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. 16 फेबुवारीपासून उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी सुरू करण्यात आली आहे. अनेक महिला उमेदवार आपल्या लहान बाळासह भरती प्रक्रियेसाठी येतात. त्यांची येथे आल्यानंतर गैरसोय होऊन नये म्हणून त्यांच्या मैदानी व शारीरिक चाचणीला प्रथम प्राधान्य देऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Maharashtra police
Pune Municipal Election Analysis: वारजे-पॉप्युलरनगर प्रभाग ३२ मध्ये भाजपचा क्लीन स्वीप

प्रत्येक दिवशी अंदाजे 3 हजारांवर महिलांना धावण्यासह इतर चाचण्यांसाठी बोलावण्यात येत आहे. दर दिवशी 50 ते 60 महिला आपल्या लहान चिमुरड्यांना सोबत घेऊन आल्याचे दिसून आले. मात्र, धावताना, गोळाफेक करताना उशीर होऊन मुलांची हेळसांड होऊ शकते. त्यामुळे भरतीवेळी मुलांसह येणाऱ्या महिला उमेदवारांना नोंदणीकृत चिठ्ठी देऊन त्यांना सर्वांत पुढे बोलावले जाते. महिलांची 800 मीटर धावणे, गोळाफेक, 100 मीटर धावण्याची चाचणी इतरांपेक्षा आधी पूर्ण केली जात आहे. त्यामुळे संबंधित महिलांना मुलांना वेळ देता येत आहे.

Maharashtra police
Pune Shiv Jayanti Traffic Diversion: शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीच्या मार्गात बदल; कोणते रस्ते, पर्यायी माग काय?

नातेवाइकांची सोय, मुलांना बिस्किटे

सोबत लहान मुलांना घेऊन आलेल्या उमेदवारांच्या नातेवाइकांना पोलिस मुख्यालयात असलेल्या रीक्रिएशन हॉलमध्ये बसण्याची सोय केली आहे. त्यांच्या खाऊची देखील सोय केली असून, महिला पोलिस अंमलदारांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Maharashtra police
Kharadi Builder Encroachment Action: खराडीतील बिल्डरसाठी अतिक्रमण कारवाई; आदेश कुणाचा, प्रशासनालाच अंधार

पोलिस भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांसह इतर उमेदवारांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासोबत चाचणीसाठी सोबत लहान मुले घेऊन येणाऱ्या महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले आहे. त्यांना सर्वांत आधी बोलावून घेत चाचणी पूर्ण केली जात आहे.

संजय पाटील, अपर पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news