पुणे : लोहगाव येथील जुगार अड्यावर गुन्हे शाखेचा छापा

पुणे : लोहगाव येथील जुगार अड्यावर गुन्हे शाखेचा छापा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

लोहगाव धानोरी येथील सर्व्हे नंबर 261/1 येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभगाने छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी जुगार घेणार्‍या तीन जणांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर नरसिंग शावणे (42, रा. लोहगाव), बबन बन्सी सरोदे (51, रा. विश्रांतवाडी, पुणे), धनंजय बापुराव गुट्टे (35, रा. धानोरी पुणे) हे तिघे कल्याण मटका जुगार चिठ्ठ्यावर जुगार घेत होते. तर यावेळी सुरज माणिकराव मुळे (36, लोहगाव), अमित सुखदेव शेलार (25, दोघेही रा. विश्रांतवाडी), सनी राम तामचेकर (27, रा. येरवडा), संदिप अरूण भागवत (42, रा. धानोरी) आणि बबलू बाळू राठोड (27, रा. येरवडा) हे पाच जण जुगार खेळताना आढळून आल्याने त्यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून यावेळी चार हजाराचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

बुधवारी (दि.30) रोजी धानोरी येथील जकात नाक्याजवळ बेकायदेशिररित्या जुगार खेळत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाण, हणमंत कांबळे यांनी केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news