पुणे पोलिसांनी जप्त केलेले ५ कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट; गांजा, एमडी, कोकेन, चरसचा समावेश

पुणे पोलिसांनी जप्त केलेले ५ कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट; गांजा, एमडी, कोकेन, चरसचा समावेश
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी अमली पदार्थतस्करांकडून जप्त केलेले तब्बल 4 कोटी 75 लाख 53 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीमध्ये नष्ट केले. त्यामध्ये गांजा, एमडी, कोकेन, चरस आणि पॉपिस्ट्रॉ या अमली पदार्थांचा समावेश होता. शहरातील 21 पोलिस ठाण्यांत तब्बल 80 गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेले हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. पोलिसांनी नष्ट केलेल्या अमली पदार्थांमध्ये 67 लाख 78 हजार 20 रुपये किमतीचा 338 किलो 901 ग्रॅम 291 मिलिग्रॅम गांजा, 1 कोटी 97 लाख 17 हजार 214 किमतीचे 1 किलो 114 ग्रॅम 481 मिलिग्रॅम मेफेड्रोन (एमडी), 2 कोटी 13 लाख 94 हजार 485 रुपय किमतीचे 1 किलो 426 ग्रॅम 299 मिलिग्रॅम कोकेन, 19 लाख 66 हजार रुपये किमतीचे 1 किलो 966 ग्रॅम चरस, 2 लाख 87 हजार 530 रुपये किमतीचे 28 किलो 753 ग्रॅम पॉपिस्ट्रॉ, 4 लाख 9 हजार 872 रुपये किमतीचे 136 ग्रॅम 624 मिलिग्रॅम हेरॉईन असा एकूण 4 कोटी 75 लाख 53 हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.

भारत सरकार अर्थ मंत्रालय व महसूल विभाग, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तसेच महाराष्ट्र शासन गृहविभाग (विशेष) यांच्या अधिसूचना व तरतुदीनुसार तसेच राज्याचे पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभागाच्या परिपत्रकानुसार मंगळवारी (दि. 12) पुणे शहर आयुक्तालयातील मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, कमिटी सदस्य पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार, सहायक रासायनिक विश्लेषक जि. भ. सदाकाळ, वैज्ञानिक सहायक प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा पुणेचे प्र. अ. लेंडे, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणेचे प्रमोद डोके, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क 'बी' विभाग विठ्ठल बोबडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क 'जी' विभाग एस. के. कोल्हे यांच्या उपस्थित अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार, पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, सुनील थोपटे, आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news