Pune Protest Permission Rules: पुण्यात परवानगीशिवाय आंदोलनाला ब्रेक; एफसी रोड, जेएम रोडसह प्रमुख चौकांवर पोलिसांचा कडक नियम

सोशल मीडियावर आंदोलनाचे आवाहन करण्यापूर्वीही घ्यावी लागणार परवानगी; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा
Protest
ProtestPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर परवानगीशिवाय आंदोलन करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सोशल मीडियावर आंदोलनाचे आवाहन किंवा पोस्ट करण्यापूर्वीही पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Protest
Pune Water Cut: पुणेकरांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट; १५ जुलैपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू

एफसी रोड, जेएम रोड, बालगंधर्व चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक तसेच नदीपात्र या शहरातील गर्दीच्या ठिकाणी आंदोलन करण्यास मनाई करण्यात येणार आहे. या ठिकाणी आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा वापर करावा, रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Protest
Pune Jewellery Shop Theft: पुण्यात सराफी पेढीवर धाडसी डल्ला; भिंतीला भगदाड पाडून ३५ तोळे सोने, सव्वा किलो चांदी लंपास

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) ज्या परिक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. त्या परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी स्पर्धापरीक्षार्थींची आहे. त्याच पार्श्वभूमीवर या स्पर्धापरीक्षार्थींनी आंदोलनाची हाक दिली आहे. स्पर्धापरीक्षार्थ्यींच्या शिष्टमंडळाने सोमवारी पुणे पोलिस आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये आंदोलनाच्या बाबात चर्चा झाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर आंदोलनाचे संदेश प्रसारित करून अचानक मोठ्या संख्येने नागरिकांना रस्त्यावर बोलावणे आणि वाहतूक ठप्प करणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. कोणतेही आंदोलन, धरणे, मोर्चा किंवा रास्ता रोको करण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असेल.

Protest
Pune Police Vacancies: पुणे पोलिस दलात मनुष्यबळाचा तुटवडा; १२ नवीन पोलिस ठाण्यांसह ४० चौक्यांच्या विस्तारासमोर मोठे आव्हान

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी उमेदवारांनी अनेकदा अचानक आंदोलन करून शहरातील प्रमुख रस्ते रोखले. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आणि कायदा- सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने यापुढे अधिक कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम पुण्यात राहून एमपीएससीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर होणार आहे. एफसी रोड, जेएम रोड, खंडोजीबाबा चौक, बालगंधर्व चौक आणि टिळक चौक, नदीपात्र या भागांत लवकरच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १६३ (पूर्वीचे फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर या ठिकाणी परवानगीशिवाय जमाव जमविणे किंवा आंदोलन करणे प्रतिबंधित राहणार आहे.

Protest
Khadakwasla Dam Residential Project: खडकवासला धरणकाठच्या बांधकामाबाबत तहसीलदारांचा महत्त्वाचा निर्णय, अधिकाऱ्यांना निर्देश

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र परवानगीशिवाय रस्ते अडविणे, कायदा हातात घेणे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अचानक गर्दी जमविणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. कोणत्याही संघटनेने किंवा गटाने आंदोलन करायचे असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून, परवानगीशिवाय सोशल मीडियावर आंदोलनाचे आवाहन करणे किंवा प्रतिबंधित ठिकाणी आंदोलन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news