Pune Jewellery Shop Theft: पुण्यात सराफी पेढीवर धाडसी डल्ला; भिंतीला भगदाड पाडून ३५ तोळे सोने, सव्वा किलो चांदी लंपास

मांजरीतील आराध्या ज्वेलर्समध्ये नियोजनबद्ध चोरी; गॅसकटरचा वापर, सीसीटीव्हीत चोरटे कैद, रखवालदार फरार
theft
theftPudhari
Published on
Updated on

पुणे: हडपसर परिसरातील मांजरीमधील एका सराफी पेढीतून चोरट्यांनी 35 तोळे सोने, सव्वा किलो चांदी चोरी केली. शेजारी असलेल्या खोलीतून दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. सराफी व्यावसायिकाला लक्ष्य करीत चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही धाडसी चोरी केल्यामुळे सराफा व्यावसायिकां मध्ये खळबळ उडाली आहे.

theft
Pune Police Vacancies: पुणे पोलिस दलात मनुष्यबळाचा तुटवडा; १२ नवीन पोलिस ठाण्यांसह ४० चौक्यांच्या विस्तारासमोर मोठे आव्हान

ही घटना रविवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास म्हसोबावस्ती, मुंढवा रस्ता येथील आराध्या ज्वेलर्समध्ये घडली. याप्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम दुकानालगतची खोली गाठली. त्यानंतर भिंतीला मोठे भगदाड पाडून थेट सराफी दुकानात प्रवेश केला. दुकानातील लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडून त्यांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीचा प्रकार सकाळी दुकान उघडल्यानंतर उघडकीस आला.

theft
Khadakwasla Dam Residential Project: खडकवासला धरणकाठच्या बांधकामाबाबत तहसीलदारांचा महत्त्वाचा निर्णय, अधिकाऱ्यांना निर्देश

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, चोरट्यांनी पूर्वनियोजन करून ही चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. चोरीस गेलेल्या मालाची अचूक किंमत आणि वजनाची पडताळणी सुरू आहे. चोरट्यांनी दागिने चोरण्यासाठी गॅसकटरचा देखील वापर केला आहे. एक गॅसकटर पोलिसांना सराफी पेढीत मिळून आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही चोरटे कैद झाले आहेत. मात्र, त्यांनी आपला चेहरा झाकलेला आहे.

theft
Maharashtra Revenue Officers Suspension: 15 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन, नियमबाह्य निर्णय घेणाऱ्यांना बावनकुळेंचा दणका

रखवालदार फरार

पोलिसांनी सांगितले की, दुकान असलेल्या सोसायटीने एक नेपाळी रखवालदार दोन महिन्‍यांपूर्वी कामाला ठेवला होता. त्याची राहण्याची खोली दुकानामागेच आहे. याच खोलीतून दुकानाला भगदाड पाडून चोरी करण्यात आली. रखवालदार सध्या फरार आहे. सोसायटीकडे त्याचे आधार कार्ड व इतर कोणतीच माहिती नाही. पहिला रखवालदार गावाला गेल्यामुळे दुसऱ्या रखवालदाराची सोय त्याने केली होती. दरम्यान, आता हे दोन्ही रखवालदार फरार आहेत. तसेच, सीसीटीव्ही फुटेजही अस्पष्ट आहेत.

theft
EPFO Amnesty 2026 Scheme: पीएफ ट्रस्टसाठी ईपीएफओची ‘ॲम्नेस्टी-२०२६’ योजना; सूट न मिळालेल्या संस्थांना नियमितीकरणाची संधी

यापूर्वी देखील अशा घटना

वारजे परिसरात 2022 मध्ये अशीच एक घटना घडली होती. वारजेतील लक्ष्मीमाथा परिसरात ही घटना घडली होती. सराफपेढीच्या शेजारी मसाला विक्रीचे दुकान सुरू करायचे आहे, असे सांगून दुकान भाड्याने घेतल्यानंतर त्याच दुकानातून सराफ पेढीत भगदाड पाडले होते. या वेळी चोरट्यांनी किलोमध्ये सोने चोरी केले होते, तर समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठेतील एका मोबाईल शॉपीच्या भिंतीला ड्रिलमशिनने भगदाड पाडून चोरट्यांनी 52 लाख 30 हजार रुपये किमतीचे तीनशेसात मोबाईल चोरी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news