Pune Police Vacancies: पुणे पोलिस दलात मनुष्यबळाचा तुटवडा; १२ नवीन पोलिस ठाण्यांसह ४० चौक्यांच्या विस्तारासमोर मोठे आव्हान

शहर विस्तारले, जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र पीएसआयंसह ३५ टक्के अधिकारी पदे रिक्त, २११ उपनिरीक्षकांच्या जागा रिकाम्या
Pune Police
Pune Police Pudhari
Published on
Updated on

पुणे: दिवसेंदिवस शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे बदलते स्वरूप पाहता पुण्यात नवीन १२ पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच ४० नवीन पोलिस चौक्या सुरू करण्याचा नुकताच आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, अधिकारीवर्गातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे पोलिस ठाणे, चौक्यांचे कामकाज प्रभावीपणे कसे चालविणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेषतः पुणे शहर पोलिस आयुक्तालयात मंजूर असलेल्या अधिकारी संख्येपैकी ३५ टक्के अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांवरील तब्बल २११ रिक्त जागांमुळे मनुष्यबळाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Pune Police
Khadakwasla Dam Residential Project: खडकवासला धरणकाठच्या बांधकामाबाबत तहसीलदारांचा महत्त्वाचा निर्णय, अधिकाऱ्यांना निर्देश

सध्या पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत ४५ पोलिस ठाणे आणि ११० पोलिस चौक्या कार्यरत आहेत. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन चौक्या असाव्यात, या उद्देशाने तीनपेक्षा कमी चौक्या असलेल्या २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ४० नवीन चौक्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर, पोलिस ठाणे चालविण्यासाठी किमान दहा अधिकाऱ्यांची गरज असते. तेव्हाच त्या पोलिस ठाण्याचे काम प्रभावीपद्धतीने चालू शकते.

Pune Police
Maharashtra Revenue Officers Suspension: 15 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन, नियमबाह्य निर्णय घेणाऱ्यांना बावनकुळेंचा दणका

मात्र, अधिकाऱ्यांची संख्या उपलब्ध नसल्याने नियोजनाची अंमलबजावणी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. पोलिस निरीक्षक (पीआय) संवर्गातील १८८ मंजूर पदांपैकी १६, सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) संवर्गातील २६४ पदांपैकी १९, तर पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गातील ५९९ मंजूर पदांपैकी तब्बल २११ पदे रिक्त आहेत. पीएसआय संवर्गातील जवळपास ३५ टक्के पदे रिक्त असल्याने अनेक अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

Pune Police
EPFO Amnesty 2026 Scheme: पीएफ ट्रस्टसाठी ईपीएफओची ‘ॲम्नेस्टी-२०२६’ योजना; सूट न मिळालेल्या संस्थांना नियमितीकरणाची संधी

कायदा-सुव्यवस्था, गुन्ह्यांचा तपास, वाहतूक नियोजन, बंदोबस्त, न्यायालयीन कामकाज आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना अधिकारीवर्गावर आधीच मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत नवीन चौक्यांची भर पडल्यास मनुष्यबळाचा तुटवडा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यंदा अपेक्षेपेक्षा कमी प्रोबेशनरी पीएसआय पुणे पोलिस दलाला मिळाल्याने रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे चौक्यांचा विस्तार यशस्वी करण्यासाठी केवळ इमारती उभारणे पुरेसे नसून आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे पोलिस वर्तुळातून सांगितले जात आहे. रिक्त पदे लवकर न भरल्यास चौक्यांच्या विस्तारामागील उद्देश पूर्ण क्षमतेने साध्य होणे कठीण ठरू शकते.

Pune Police
D Y Patil B School Financial Fraud Case: डी. वाय. पाटील बी-स्कूलमध्ये ५ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार? माजी संचालकावर गुन्हा दाखल

पुणे शहर नको रे बाबा?

एकेकाळी पुणे पोलिस आयुक्तालयासाठी अधिकारी वर्गात वेटींग असायचे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अनेक अधिकारी पुणे पोलिस आयुक्तालयाची मागणी करताना दिसून येत नाही. त्या पाठीमागे अमितेश कुमार यांचा धसका असल्याची चर्चा आहे. अमितेश कुमार कडक शिस्तीचे अधिकारी आहेत. शिवाय कठोर निर्णायासाठी ते ओळखले जातात. त्यांच्याकडे पोस्टिंगसाठी कोणाची शिफारस चालत नाही. अवैध धंद्याच्या विरोधात त्यांनी सुरुवातीपासूनच कडक भूमिका घेतली आहे. शिवाय त्यांना पोलिस ठाण्यातील कामात कामचुकारपणा किंवा आर्थिक देवाण घेवाण चालत नाही. तर दुसरीकडे अमितेश कुमार दररोज सायंकाळी तक्रारदारांसाठी त्यांच्या दालनात उपलब्ध असतात. तक्रारदारांच्या समोरच पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्याचा आढावा घेतला जातो. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी बदलीसाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाला पसंती न देता पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर परिक्षेत्रात आपली वर्णी लावून घेतली आहे. त्यामुळे पुण्यात तब्बल 35 टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे दिसून येते. तसेच पुण्यात बदलून आल्यानंतर मनासारखी पोस्टिंग नाही मिळाली, तर भलतीच भानगड नको म्हणून अनेक अधिकारी पुण्यासाठी वेट ॲण्ड वाॅचच्या भूमिकेत असल्याची सुद्धा चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news