Pune PMPML Bus : दहीहंडीनिमित्त पीएमपीच्या बस मार्गात बदल; असे असतील पर्यायी मार्ग?

Pune PMPML Bus : दहीहंडीनिमित्त पीएमपीच्या बस मार्गात बदल; असे असतील पर्यायी मार्ग?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहीहंडीनिमित्त वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार पीएमपी प्रशासनाकडून बसच्या काही मार्गांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

असा आहे बदल

  • शनिवारवाडा ते सिंहगड (बसमार्ग क्र. 50) या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
  • अ.ब. चौक ते सांगवी (बस मार्ग क्र. 113) या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन स्थानकावरून संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. 8, 9, 57, 94, 108, 143, 144, 144 अ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, म.न.पा. भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.
  • मार्ग क्र. 174 दिनांक 06 आणि 07 सप्टेंबर 2023 रोजी रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) म.न.पा., डेक्कन मार्गे संचलनात राहील.
  • बस मार्ग क्र. 2, 2 अ, 10, 11, 11 अ, 11 क, 13, 13 अ, 28, 30, 20, 21, 37, 38, 88, 216, 297, 298, 354, रातराणी-1, मेट्रो शटल-12 या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. मात्र, स्वारगेटकडून शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बस बाजीराव रोडने संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. 7, 197, 202 या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. 68 या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
  • स्वारगेट आगाराकडून बस मार्ग क्र. 3 व 6 हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news