Pune PMPML Bus Driver Training Issue: पीएमपीएमएल बस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; अपात्र चालक भरतीचा आरोप

अपघात व बिघाड वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर; प्रशिक्षण सक्तीची मागणी
PMPML Bus
PMPML BusPudhari
Published on
Updated on

पुणे: अलिकडील काळात पीएमपी बसचे वाढते अपघातांचे सत्र आणि रस्त्यातच बस बंद पडण्याचे प्रमाण आणि बस चोरीला जाण्यापर्यंत वाढलेला हलगर्जीपणा, यामुळे पुणेकर वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीएमपीचे काही ठेकेदार डंपर (हायवा) चालविणाऱ्या चालकांना थेट बस चालविण्यासाठी भरती करीत असून, त्यांना प्रवाशांशी वागण्याचे साधे प्रशिक्षणही दिले जात नाही, असा खळबळजनक आरोप पीएमपी प्रवासी मंचचे मानद सचिव संजय शितोळे यांनी केला आहे.

PMPML Bus
MahaRERA QR Code Project Update: महारेराचा नवा निर्णय: गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती आता QR कोडवर

शहरात गेल्या काही दिवसांत पीएमपी बसमार्फत होणारे गंभीर अपघात आणि बस बेकडाऊन, बसला आग लागणे, रस्त्यातच ऑईल लीकेज होणे, यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे बसचालक आणि वाहकांचे प्रवाशांशी तसेच इतर वाहनचालकांशी होणारे वाद ही नित्याची बाब बनली आहे.

PMPML Bus
Pune Jambul Price Drop: उन्हाच्या झळांनी जांभळांना फटका; बाजारात आवक निम्म्यावर, दरात घसरण

डंपरचालकांना शहरी वाहतुकीच्या प्रशिक्षणाचा अभाव

संजय शितोळे यांनी सद्यःस्थितीवर बोट ठेवताना सांगितले की, ठेकेदारांना पुरेसे चालक मिळत नसल्याने ते कोणत्याही अनुभव नसलेल्या व्यक्तीची भरती करीत आहेत. ज्यांना अवजड डंपर (हायवा) चालविण्याचा अनुभव आहे, अशांना थेट प्रवाशांच्या सेवेत जुंपले जात आहे. या चालकांना शहरी वाहतुकीचे नियम आणि प्रवाशांशी संवाद साधण्याचे कोणतेही भान नाही. यामुळेच रस्त्यावर वादविवाद आणि अपघात वाढत आहेत.

PMPML Bus
Maharashtra RTE Admission: आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडली; 1 लाख जागांपैकी निम्मेच प्रवेश निश्चित

प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा

या सर्व गोंधळात आता पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फक्त दंडात्मक कारवाई न करता ठेकेदारांवर वचक निर्माण करून पीएमपीकडील आणि ठेकेदारांकडील चालकांना सीआयआरटीकडून रीतसर प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.

PMPML Bus
Pune Summer Science Camp: पुणे विद्यापीठात उन्हाळी विज्ञान शिबिरे; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांची संधी

पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला लगाम घालणे आवश्यक आहे. डंपर चालवणाऱ्यांना थेट बसचे स्टेअरिंग देणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. प्रत्येक चालकाला भरतीपूर्वी सीआयआरटीकडून प्रशिक्षण सक्तीचे करावे. जर प्रशासनाने आता ठोस पावले उचलली नाहीत, तर पुणेकरांचा सार्वजनिक वाहतुकीवरचा उरलासुरला विश्वासही उडून जाईल.

संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच

कोणत्याही प्रकारे डंपरवरील चालकांची आमच्याकडे भरती केली जात नाही. बॅच बिल्ला, लायसन्स असते, त्यामुळे डंपरवरील चालक भरती होणे शक्य नाही, आम्ही यापूर्वी चालकांना प्रशिक्षण दिले आहे, लवकरच उर्वरित चालकांनाही प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना रस्त्यावर गाडी कशी चालवायची, प्रवाशांशी सौजन्याने कसे वागायचे, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल. देखभाल दुरुस्ती विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेऊन त्यांनाही प्रशिक्षणाची गरज वाटल्यास त्याबाबतही प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय ठेकेदारांना बोलावून यासंदर्भात सक्त सूचना केल्या जातील.

यशवंत हिंगे, मुख्य वाहतूक अधिकारी, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news