Pune Illegal Flex Banner Rules: पुण्यात फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा; नाव आणि फोटो असलेल्यांनाही गुन्ह्यात घेणार!

विनापरवाना बॅनर, पोस्टर लावल्यास खर्चाची वसुली; जाहिरातदार, मुद्रक आणि आयोजकही कारवाईच्या कक्षेत
Illegal Flex Banner
Illegal Flex BannerPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील चौक, रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणे फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टरने विद्रूप करणाऱ्यांविरोधात महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. विनापरवाना जाहिरातबाजी केल्यास संबंधित फ्लेक्स किंवा बॅनर काढून टाकण्याबरोबरच त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. विशेष म्हणजे, फ्लेक्सवर नाव किंवा छायाचित्र प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींसह जाहिरातदार, मुद्रक आणि कार्यक्रम आयोजकांविरोधातही फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहीर केले आहे.

Illegal Flex Banner
Pune Garbage Fine Rules: पुण्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेचा दंडुका; पाचव्यांदा नियमभंग केल्यास दुकान सील!

महापालिकेने २३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक, दुभाजक, विद्युत खांब, झाडे, पूल तसेच खासगी मालमत्तांवरही पूर्वपरवानगीशिवाय होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे, कमानी आणि कटआउट लावता येणार नाहीत. महाराष्ट्र मालमत्तेचे विरूपण प्रतिबंध अधिनियम १९९५ आणि महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम १९४९ नुसार कारवाई केली जाणार आहे. फ्लेक्सवर एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा छायाचित्र असल्यास त्या व्यक्तीची संमती गृहीत धरली जाणार आहे.

Illegal Flex Banner
Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये बिबट्याचा महिलांवर हल्ला; भात कापणी करताना एकीचा मृत्यू, दुसरी जखमी

संबंधित व्यक्तीने आपली संमती नसल्याचा लेखी खुलासा क्षेत्रीय कार्यालय आणि पोलिसांकडे दिलेला असेल, तरच त्याचा विचार केला जाईल. प्रत्येक पोस्टरवर मुद्रकाचे नाव आणि पत्ता छापणेही बंधनकारक आहे. अन्यथा, मुद्रकावरही कारवाई होणार आहे. अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांबरोबरच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांनाही सहआरोपी केले जाणार आहे. त्यामुळे राजकीय नेते, जाहिरातदार, मुद्रणालये आणि कार्यक्रम आयोजकांचीही अडचण वाढणार आहे. अधिकृत जाहिरातींसाठी निर्धारित जागांवर शुल्क भरून परवानगी घेणे आवश्यक आहे.

Illegal Flex Banner
Pune Rooftop Solar Projects: पुणे जिल्ह्यात सौरऊर्जेचा झपाटा; ९५ हजारांहून अधिक ग्राहकांनी उभारले रूफटॉप प्रकल्प

महापालिकेच्या संकेतस्थळावर करा तक्रार

शहरात विनापरवाना फ्लेक्स, बॅनर, पोस्टर किंवा होर्डिंग लावल्याचे आढळल्यास नागरिकांना महापालिकेच्या bhauflex kadha.pmc. gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येणार आहे. तसेच, PMC-Care क्रमांकावरही तक्रार करता येईल. प्राप्त तक्रारीनुसार महापालिकेकडून नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

Illegal Flex Banner
Pune BDP Reservation: पुण्यातील बीडीपी आरक्षणाबाबत मोठी शिफारस; ७० टक्के जागेवर उद्यान, उर्वरित ३० टक्क्यांवर मर्यादित बांधकामाचा पर्याय

फ्लेक्सबाजी केल्यास कोणावर कारवाई?

  • फ्लेक्स लावणारा : फौजदारी गुन्हा दाखल.

  • फ्लेक्सवरील व्यक्ती : नाव किंवा छायाचित्र असल्यास संमती गृहीत धरली जाणार.

  • जाहिरातदार संस्था : गुन्हा दाखल होणार.

  • मुद्रणालय : मुद्रकाचे नाव-पत्ता नसल्यास कारवाई; सहआरोपी करणार.

  • कार्यक्रम आयोजक : फौजदारी कारवाईच्या कक्षेत.

  • आर्थिक कारवाई : फ्लेक्स काढण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल.

  • विशेष तरतूद : कारवाईपूर्वी स्वतंत्र नोटीस दिली जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.