नारायणगाव: पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथील भोईरवाडी परिसरात भात कापणीचे काम सुरू असताना बिबट्याने दोन महिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला जखमी झाली आहे. बुधवारी (दि. २५) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या हल्ल्यात भिमाबाई जिजाभाऊ भोईर यांचा मृत्यू झाला असून अश्विनी सुरेश भोईर या जखमी झाल्या आहेत. दोन्ही महिला शेतात भात कापणीचे काम करत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे पिंपळगाव जोगा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान घटनेची माहिती समजतात वनखात्याची पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.