Pune Rental Agreement: पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेकरार दस्तनोंदणी प्रलंबित; नोकरदार वर्गाला त्रास

2 हजाराहून अधिक भाडेकरार प्रलंबित; आरटीई, बँक, पासपोर्टसाठी भाडेकरार कायदेशीर पुरावा म्हणून आवश्यक
Rental Agreement
Rental AgreementPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून सुमारे दोन हजारांहून अधिक सदनिकांमधील भाडेकरूंच्या भाडेकरारांची दस्तनोंदणी प्रलंबित आहेत. नोंदणी मुद्रांक विभागाकडून त्याला मान्यता मिळालेली नाही. नोकरदार वर्गाला समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे.

Rental Agreement
Pune PMC Expenditure: दुरुस्ती व स्वच्छता खरेदीवर कोट्यवधी खर्चावर चर्चा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाडेकराराच्या दस्ताची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे. नवीन व्यवसाय, उद्योगधंदा सुरू करण्यासाठी, सोसायटीत प्रवेश करण्यासाठी, वाहनचालक परवाना, वाहन खरेदी करण्यासाठी, बँक खाते, कर्ज काढण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क अधिनियम (आरटीई) प्रवेशासाठी, पासपोर्ट, प्राप्तिकर भरण्यासाठी, सरकारी कार्यालयात रहिवासी पत्ता पुरावा म्हणून नोंदणीकृत भाडे करारनामा ग््रााह्य असून, तो कायद्याने बंधनकारक आहे.

Rental Agreement
Pune Stall Owner Relief: स्टॉलधारकांसाठी अभय योजनेसारखी सवलत योजना प्रस्तावित

शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत सर्वसामान्यांसाठी 25 टक्के कोटा राखून ठेवला आहे. त्यासाठीचे अर्ज भरण्याची मुदत संपत आली आहे. काही पालक नवीन खोली भाड्याने घेऊन राहत असतात. काहींचे करार झालेले नसतात. अशा परिस्थिती राहत्या जागेसाठीचा महत्त्वाचा पुरावा म्हणून भाडेकरार ग््रााह्य धरला जातो. भाडेकरार नोंदवून घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये 15 ते 20 दिवस लागत आहेत.

Rental Agreement
Pune Property Tax Waiver: 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी नाकारली

याबाबत असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्याकडे तक्रार केली. लिव्ह अँड लायसन्सची दुय्यम निबंधक कार्यालयात ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या दस्ताची नोंदणी त्याच दिवशी पूर्ण करण्याबाबत सूचना यापूर्वी वारंवार देण्यात आल्या आहेत. परंतु, भाडेकरारांची प्रलंबित संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याकडे असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सह जिल्हा निबंधकांचे लक्ष वेधले आहे.

Rental Agreement
Pune Deluxe Paplet Market: युद्धामुळे डिलक्स पापलेटचा स्थानिक बाजारात आढळ; किलोला 1,900 रुपये

...या कार्यालयात रखडली दस्तनोंदणी

शहरातील हवेली क्रमांक 8, 9, 10, 11, 12, 14, 16, 18, 20, 22, 25, 26 यांसह विविध कार्यालयांमध्ये ऑनलाइन भाडेकराराचे दस्तनोंदणीसाठी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news