Pune Deluxe Paplet Market: युद्धामुळे डिलक्स पापलेटचा स्थानिक बाजारात आढळ; किलोला 1,900 रुपये

कुवेतसह परदेशातील निर्यात बंद झाल्यामुळे पुण्यात डिलक्स पापलेट उपलब्ध, व्यापाऱ्यांना चांगला दर मिळत आहे
Fish
Fish Pudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती चिघळल्याने देशातून होणारी मासळीची निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, देशाच्या पश्चिम किनारपट्टीहून कुवेतमध्ये जाणाऱ्या डिलक्स पापलेटलाही त्याचा फटका बसला आहे. निर्यात बंद झाल्याने एरवी पुण्याच्या बाजारात न दिसणारे डिलक्स पापलेट पुणेकरांच्या ताटात दिसू लागले आहे. शहरातील मासळीबाजारात दररोज 70 ते 80 किलो डिलक्स पापलेट दाखल होत असून, त्याचा किलोला 1 हजार 900 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

Fish
Telegram Exam Paper Scam: टेलिग्रामवर दहावी प्रश्नपत्रिका विक्री प्रकरणात चंद्रपूर तरुण अटकेत

देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून ताजा तसेच शीतगृहातील पापलेटची निर्यात करण्यात येते. यामध्ये, कुवेतमध्ये डिलक्स पापलेटची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. 700 ग््रॉमपासून ते एक किलोपर्यंत असणारा हा मासा कमी प्रमाणात मिळत असल्याने त्याला दरही चांगले मिळतात. त्यामुळे, या पापलेटची निर्यात करण्याकडे व्यापारीवर्गाचा जास्त कल असतो. मात्र, युद्धामुळे निर्यात बंद झाल्याने डिलक्स पापलेटने आपला मोर्चा पुण्याच्या बाजाराकडे वळविला आले. त्याला मागणीही चांगली असल्याने त्याच्या किलोला 1 हजार 900 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. डिलक्सखेरीज एरवी दररोज येणारे सुपर, कापरी आदी पापलेटही बाजारात दाखल होत आहेत. जास्तीत जास्त 500 ते 600 ग््रॉमपर्यंत बाजारात येत असलेल्या या पापलेटच्या किलोला 1 हजार 100 ते 1 हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे.

Fish
Maharashtra Kesari Wrestling: पुण्यातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 1500 मल्लांचा सहभाग, आकर्षक बक्षीस

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे सध्या कुवेतसह काही देशांकडे जाणारी पापलेटची निर्यात थांबली आहे. त्यामुळे एरवी परदेशात जाणारा डिलक्स पापलेट स्थानिक बाजारात येऊ लागला आहे. हा मासा मोठ्या आकाराचा, जास्त मांस असलेला आणि कमी प्रमाणात मिळणारा असल्याने त्याला घाऊक बाजारात किलोला सुमारे 1 हजार 900 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. निर्यात पुन्हा सुरू झाली, तर स्थानिक बाजारातील ही आवक पुन्हा कमी होईल.

ठाकूर परदेशी, मासळी विक्रेते, गणेश पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news