Pune Petrol Pump Closure: पुण्यात 20-30% पेट्रोल पंप बंद; रांगा वाढल्या, पण तुटवडा नाही!

कंपन्यांच्या अ‍ॅडव्हान्स पेमेंट नियमामुळे अडचण; लवकरच स्थिती सुरळीत होणार
Pune Petrol Pump Closure
Pune Petrol Pump ClosurePudhari
Published on
Updated on

पुणे: पेट्रोल पंप चालकांना कंपन्यानी ॲडव्हान्स मध्ये पैसे मागितले आहेत, ते ऍडव्हान्स पैसे देण्यासाठी नसल्याने शहरातील 20 ते 30 टक्के पेट्रोल पंप बंद आहेत. त्यामुळे ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहेत. तेथे रांगा लागल्याचे चित्र आहे. पेट्रोल डिझेलचा कोणताही तुटवडा नाही, नागरिकांनी रांगा लावू नये, जे पेट्रोल पंप चालक कपन्यांनाअँडव्हान्स पेमेंट देवू शकले नाहीत, त्यांचेच पेट्रोल पंप बंद आहेत.

Pune Petrol Pump Closure
Pune PMC Election Staff Payment: पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा संताप; निवडणूक भत्ते थकीतच

तसेच, आज बँकांना सुटी असल्याने काही पेट्रोल पंप चालकांना कंपनीला ऍडव्हान्स पेमेंट करता आलेले नाही. त्यामुळे त्यांना कंपन्यांनी पेट्रोलचा पुरवठा केला नाही. पेट्रोल तुटवड्याचा फटका नाही तर कंपन्यांनी पेट्रोल वाटपाचे धोरण बदलल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.लवकरच परिस्थिती सुरळीत होईल, असे ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Pune Petrol Pump Closure
Pune Budget Clash: पुणे महापालिकेत खडाजंगी! कोंढवा निधीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी जवळील पेट्रोल पंप गुरुवारी पेट्रोल डिझेल संपल्याचा बोर्ड लावून बंद केल्याचे पाहायला मिळाले. तसेच माणिकबाग जवळील पेट्रोल पंपावर दुचाकी स्वरांनी प्रचंड गर्दी केलयाचे चित्र पहायला मिळाले होती. याशिवाय सिंहगड रोड आणि वडगाव धायरी भागातील पेट्रोल पंप याशिवाय शहरातीलही काही पेट्रोल पंपावर वाहन वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news