Pune PMC Election Staff Payment: पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा संताप; निवडणूक भत्ते थकीतच

दोन महिने उलटूनही मोबदला नाही; नियमांमध्ये दुजाभाव केल्याचा संघटनेचा आरोप
Money
MoneyPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या निवडणुका होऊन दोन महिने उलटूनही निवडणूक कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला मिळाला नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. निवडणूक विभागाने अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वेगवेगळी नियमावली लागू केल्याने कर्मचाऱ्यांवर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप पीएमसी एम्प्लॉइज युनियनने केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना समान भत्ता देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Money
Pune Budget Clash: पुणे महापालिकेत खडाजंगी! कोंढवा निधीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी 2026 मध्ये महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पार पडल्या. या प्रक्रियेसाठी 20 हजार कर्मचारी नियुक्त केले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, या कर्मचाऱ्यांना जुलै 2025 च्या मूळ वेतनाच्या आधारे अतिकालिक भत्ता, परिश्रमिक भत्ता आणि मानधन देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात अतिरिक्त कामाच्या तासांचा मोबदला देताना प्रशासनाने दिवसाला केवळ तीन तास आणि एकूण कालावधीत कमाल 165 तासांपर्यंतच भत्ता देण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Money
Pune Budget Controversy: पुणे बजेटवर प्रशांत जगतापांचा हल्लाबोल; ‘₹15,669 कोटींचा अर्थसंकल्प वास्तवापासून दूर’

याशिवाय विविध अटी व शर्ती लादण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पीएमसी एम्प्लॉइज युनियनने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी व कर्मचारी, असा भेदभाव न करता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भत्ते दिले जात असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news